कंगना रणौत आणि तिच्यामुळे निर्माण होणारे वाद आता बी-टाऊनला काही नवीन राहिलेले नाहीत. कंगना तिच्या वादग्रस्त विधानांमुळे सतत चर्चेत असते. कंगनाने अभिनयक्षेत्रात स्वतःचं स्थान बळकट केलं. त्याचबरोबरीने तिने दिग्दर्शन क्षेत्रातही पदार्पण केलं आहे. आपल्या चित्रपटाशी संबंधित प्रत्येक निर्णयांमध्ये तिचा समावेश असतो. कंगनाचं चित्रपटसृष्टीमधील काही मंडळींशी पटत नाही. त्यातीलच एक म्हणजे दिग्दर्शक हंसल मेहता. हंसल यांनी कंगनाबाबत आता स्पष्टपणे बोलणं पसंत केलं आहे.

आणखी वाचा – “हे चित्र आम्हा हिंदूंना सुखावणारं”; एकनाथ शिंदे यांच्यासाठी अभिनेते शरद पोंक्षे यांची खास पोस्ट

२०१७मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘सिमरन’ चित्रपटाचं दिग्दर्शन हंसल मेहता यांनी केलं होतं. यामध्ये कंगना मुख्य भूमिकेत होती. पण कंगनाबरोबर काम करणं हिच मोठी चूक होती असं हंसल यांचं म्हणणं आहे. एका ऑनलाईन न्यूज पोर्टलशी संवाद साधताना हंसल म्हणाले, “कंगना ही एक उत्तम अभिनेत्री आहे. पण सेटवर तिचं आणि माझं कधी जमलंच नाही. ‘सिमरन’साठी तिला जे हवं होतं तेच तिने शूट करुन घेतलं.”

पुढे बोलताना ते म्हणाले, “आपल्याला जे हवं, ज्याच्यावर आपला विश्वास बसेल तेच प्रत्येक भूमिकेमध्ये उतरलं पाहिजे असा तुमचा सतत अट्टाहास नसावा. तिने तिचा पर्याय प्रत्येकवेळी निवडला. पण कंगनावर टिका करण्याची ही वेळ नाही. ती खूप मोठी अभिनेत्री आहे. पण कंगनाबरोबर काम करणं ही माझीच खूप मोठी चूक होती.”

आणखी वाचा – VIDEO : ‘कॉफी विथ करण’च्या शोमध्ये लग्नाच्या पहिल्या रात्रीबाबत भलतंच बोलून गेली आलिया भट्ट, व्हिडीओ व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हंसल यांनी कंगनाबरोबर काम केलं. पण त्यांना यामधून मोठा धडा मिळाला. ‘सिमरन’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरफ्लॉप ठरला. कंगनाने या चित्रपटादरम्यान आपल्या मनाचा कारभार केला असल्याचं हंसल यांचं स्पष्ट मत आहे. काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेला कंगनाचा ‘धाकड’ चित्रपटही अयशस्वी ठरला. आता कोणता नवीन चित्रपट ती घेऊन येणार? हे पाहावं लागेल.