मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर एकनाथ शिंदे मुंबईतील अनेक ठिकाणी भेटी देत आहेत. मंगळवारी (५ जुलै) मुंबई येथील सिद्धिविनायक मंदिराला त्यांनी भेट दिली. तसेच श्री सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले. भर पावसातही एकनाथ शिंदे हे बऱ्याच ठिकाणी भेट देताना दिसत आहेत. सिद्धिविनायकाचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाला भेट दिली. त्याचबरोबरीने स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केलं. यादरम्यानचा फोटो देखील समोर आला. हा फोटो पाहून अभिनेते शरद पोंक्षे यांनी खास पोस्ट शेअर केली आहे.

आणखी वाचा – VIDEO : ‘कॉफी विथ करण’च्या शोमध्ये लग्नाच्या पहिल्या रात्रीबाबत भलतंच बोलून गेली आलिया भट्ट, व्हिडीओ व्हायरल

rajeev chandrasekhar vs shashi tharoor
तिरुवनंतपूरममध्ये राजीव चंद्रशेखर यांच्या उमेदवारीनं शशी थरूर यांच्यासमोर आव्हान; मतदारसंघात कोणाचा होणार विजय?
Govinda stopped the fleet of vehicles and bought shoe from small shop
गोविंदाला बुटाची भुरळ! रोड शो थांबवून खरेदी केले बूट; किंमत ऐकून तुम्ही म्हणाल…
ncp jitendra awhad, sister shubhangi garje
जितेंद्र आव्हाड यांच्या भगिनी म्हणाल्या, “आनंद परांजपे यांनी औकातीत रहावे, घर सांभाळण्यासाठी आम्ही सक्षम…”
drama review of Himalayachi sawali
‘ती’च्या भोवती..! हिमालयाएवढी खंबीर!

शरद पोंक्षे यांची पोस्ट
शरद पोंक्षे यांनी एकनाथ शिंदे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करत असल्याचा फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केला आहे. या फोटोमध्ये त्यांच्याबरोबर इतर त्यांचे काही सहकारी देखील दिसत आहेत. हा फोटो शेअर करत असताना शरद पोंक्षे म्हणाले, “मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे सावरकरांना मानवंदना देण्यासाठी गेले. हे चित्र आम्हा हिंदूंना सुखावणारं आहे.” शरद पोंक्षे यांच्या या पोस्टला अनेकांनी पसंती दर्शवली आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाला आवर्जून भेट दिल्यामुळे काहींनी कमेंटच्या माध्यमातून एकनाथ शिंदे यांचं कौतुक देखील केलं आहे. याआधीही शरद पोंक्षे यांनी एकनाथ शिंदे यांच्याबाबत एक पोस्ट शेअर केली होती. आपल्या आजारपणामध्ये एकनाथ शिंदे यांनी मदत केली असल्याचंही शरद पोंक्षे यांनी म्हटलं होतं. तसेच एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पद मिळाल्यानंतर त्यांचं अभिनंदन देखील त्यांनी केलं.

आणखी वाचा – Photos : सुप्रसिद्ध दिग्दर्शकाच्या लेकीचे बॉयफ्रेंडसोबत रोमान्स करतानाचे ‘ते’ बोल्ड फोटो व्हायरल

सध्या राज्याचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भर पावसातही सगळीकडे भेटी देत आहेत. शिवाजी पार्क येथील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला देखील एकनाथी शिंदे यांनी भेट देऊन त्यांना अभिवादन केलं. त्याचबरोबरीने दादर येथील चैत्यभूमी येथे उपस्थित राहून महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आदरपूर्वक नमन केलं. इतकंच नव्हे तर मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच ते जेव्हा ठाण्यात आले तेव्हा त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं.