‘हमशकल्स’च्या सेटवर बिपाशा बासू आणि इशा गुप्ताची गट्टी

‘हमशक्ल्स’च्या सेटवर बिपाशा बासू आणि इशा गुप्ता या दोन बॉलिवूड अभिनेत्रींमध्ये चांगलीच गट्टी असल्याचे दिसून आले.

‘हमशक्ल्स’च्या सेटवर बिपाशा बासू आणि इशा गुप्ता या दोन बॉलिवूड अभिनेत्रींमध्ये चांगलीच गट्टी असल्याचे दिसून आले. ‘राझ ३’ चित्रपटातील बिपाशाची ही सहनायिका बिपाशाच्या कामाचे अखंड कौतूक करत होती. ‘राझ ३’ च्यावेळी भेटताच क्षणी दोघींमध्ये मैत्रीपूर्ण संबंध निर्माण झाल्याचे सांगत ‘हमशक्ल्स’च्या चित्रीकरणादरम्यान मोरिशसमध्ये दोघिंनी भरपूर वेळ एकत्र घालविल्याचेदेखील ती म्हणाली. दोघींना व्यायामाची आवड असून, दोघीही न चुकता प्रत्येकदिवशी व्यायाम करत असल्याची माहिती देत मॉरिशसमध्ये दोघींनी एकत्र व्यायाम केल्याचे तिने सांगितले. मॉरिशसपासूनचा त्यांचा हा मैत्रीपूर्ण प्रवास मुंबईतदेखील सुरूच होता आणि एकमेकींच्या संपर्कात राहात तो कायम ठेवण्याचे दोघींनी ठरवले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Bipasha basu esha gupta bond during humshakals shoot