बिग बॉस फेम आणि अभिनेत्री उर्फी जावेद आणि भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांच्या सुरु असलेले वाकयुद्ध संपता संपत नाही. चित्रा वाघ यांनी उर्फीच्या तोकड्या कपड्यांवरून तिच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. याबाबत मुंबई पोलिसांना पत्रही देण्यात आलं. तसेच, उर्फीने असाच नंगानाच सुरु ठेवला तर तिचं थोबाड फोडणार, अशी आक्रमक भूमिका चित्रा वाघ यांनी घेतली होती. त्यावर काही तासांपूर्वी उर्फीने ट्वीट करत चित्रा वाघ यांच्यावर निशाणा साधला. “मेरी डीपी इतनी धांसू, चित्रा मेरी सासू,” असं उर्फीने यात म्हटलं. त्यावर आता चित्रा वाघ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

उर्फी जावेदने काही तासांपूर्वी दोन ट्वीट करत चित्रा वाघ यांना डिवचलं होतं आहे. उर्फीने एक फोटो ट्वीट केला आहे. त्यावर तिने चित्रा वाघ यांना टॅग करत लिहिलं की, “लेकिन अभी बोहोत सुधार बाकी है. सॉरी चित्रा वाघ जी. आय लव्ह यू.” तर दुसऱ्या एका ट्वीटमध्ये, “मेरी डीपी इतनी धांसू, चित्रा मेरी सासू,” असं उर्फीने म्हटलं आहे. त्यावर आता चित्रा वाघ यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.

आणखी वाचा : “मेरी डीपी इतनी धांसू, चित्रा मेरी सासू”, उर्फीने ट्वीट करत चित्रा वाघ यांना पुन्हा डिवचलं

“मला यावर काहीही बोलायचं नाही. तिने कितीही काहीही लिहिलं, शब्दांची मोडतोड केली, मला काहीही बोलली तरी हा नंगानाच आम्ही छत्रपतींच्या महाराष्ट्रात चालू देणार ही आमची भूमिका कालही होती, आजही आहे आणि यापुढेही राहिल. आमच्याकडे प्रत्येक रोगावर औषध आहे”, असे चित्रा वाघ यांनी म्हटले.

दरम्यान, चित्रा वाघ यांनी तुळजापुरात बोलताना उर्फी जावेदवर टीका केली होती. “तुम्ही चार भितींच्या आतमध्ये काय करता, हा तुमचा प्रश्न आहे. पण, सार्वजनिक ठिकाणी आणि समाजात असल्यावर तुम्हाला कपड्यांचं भान असायला हवं पाहिजे. मुली जीन्स, टॉप्स, फ्रॉक घालतात. त्या उघड्या-नागड्या फिरत नाहीत. ते कपडे आणि ही बाई नंगानाच करत आहे, याच्यात फरक आहे. फॅशन आणि नंगानाच याच्यामध्ये काही आहे का नाही?,” असा सवाल चित्रा वाघ यांनी विचारला होता.

आणखी वाचा : उर्फी जावेद सासू म्हणतेय त्या चित्रा वाघ यांच्या मुलाला पाहिलंय का? पाहा फोटो

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“रस्त्यावर येऊन लोकांना चेकळावयाचं काम सुरु आहे. पोलीस त्यांच काम करतील. आम्ही मात्र आमचं काम करु. ऐकलं तर ठिक आहे, नाहीतर सांगितलं आहे काय करणार आहोत. काल कोणतरी म्हटलं कपड्यांची अ‍ॅलर्जी आहे. सगळ्या अ‍ॅलर्जीच्या गोळ्या आपल्याकडे आहे. त्यामुळे काळजी करण्याचं काम नाही,” असेही चित्रा वाघ म्हणाल्या होत्या.