“महाविद्यालयीन दिवसांची मजा घेताच आली नाही कारण…” पंकजा मुंडेंना आठवले जुने दिवस

झी मराठीच्या ‘बस बाई बस’ कार्यक्रमामध्ये पंकजा मुंडे हजेरी लावणार आहेत.

“महाविद्यालयीन दिवसांची मजा घेताच आली नाही कारण…” पंकजा मुंडेंना आठवले जुने दिवस
झी मराठीच्या ‘बस बाई बस’ कार्यक्रमामध्ये पंकजा मुंडे हजेरी लावणार आहेत.

झी मराठीचा ‘बस बाई बस’ कार्यक्रम सध्या चांगलाच चर्चेत आहे. या कार्यक्रमामध्ये आतापर्यंत काही राजकीय विश्वातील महिलांनी हजेरी लावली. यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस, खासदार सुप्रिया सुळे यांचा समावेश आहे. आता भाजपा नेत्या पंकजा मुंडे देखील या कार्यक्रमामध्ये हजेरी लावणार आहेत. पंकजा मुंडे यांचे या कार्यक्रमामधील काही प्रोमो सोशल मीडियावर प्रदर्शित झाले आहेत.

आणखी वाचा – Photos : …तर असा साजरा झाला प्राजक्ता माळीचा वाढदिवस, सेलिब्रेशनचे काही खास फोटो व्हायरल

या कार्यक्रमाचं सुत्रसंचालन अभिनेता सुबोध भावे करत आहे. तसेच पंकजा मुंडे त्यांच्या खासगी आयुष्याबाबत आणि एकूणच राजकीय परिस्थितीबाबत आपलं मत मांडताना दिसतील. या कार्यक्रमाच्या एका प्रोमोमध्ये पंकजा मुंडे यांना त्यांच्या महाविद्यालयीन दिवसांबाबत प्रश्न विचारण्यात आला.

पाहा व्हिडीओ

त्यावेळी म्हणाल्या, “माझ्या महाविद्यालयीन दिवसांमध्ये मुंडे साहेब गृहमंत्री होते. त्यांच्याबरोबर सुरक्षारक्षक असायचे. त्याचबरोबरीने माझ्याबरोबरही तेव्हा सुरक्षारक्षक होते. त्यामुळे मला महाविद्यालयीन दिवसांची मजा घेताच आली नाही. सुरक्षारक्षक बघूनच लोक घाबरायचे. पण एकदा कोणाशी मैत्री झाली की ती शेवटपर्यंत असायची.” पंकजा मुंडे यांनी हसत याचं उत्तर दिलं. त्यानंतर त्यांना आणखी एक हटके प्रश्न विचारण्यात आला.

आणखी वाचा – “आपल्याच अर्थव्यवस्थेचं नुकसान आणि…” ‘बॉयकॉट लाल सिंग चड्ढा’ ट्रेंडबाबत अक्षय कुमारचं स्पष्टीकरण

तुम्हाला महाविद्यालयीन दिवसांमध्ये कोणी प्रपोज केलं आहे का? या प्रश्नाचं उत्तर देताना त्या हसत म्हणाल्या, “अजिबात नाही. तो सुखद क्षण मला अनुभवताच आला नाही.” पंकजा यांच्या या उत्तराने मंचावरील उपस्थितांच्या चेहऱ्यावरही हास्य आलं. त्यांच्या या कार्यक्रमाचा व्हिडीओ सध्या चांगला व्हायरल होत आहे. यावर नेटकरी विविध प्रतिक्रियाही देताना दिसत आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bjp leader pankaja munde bus bai bus zee marathi show she talk about her personal life and college days watch video kmd

Next Story
पुन्हा एकदा हिंदी चित्रपटात झळकण्यासाठी क्षिती सज्ज, लवकरच दिसणार ‘या’ चित्रपटात
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी