नाशिक : लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी निवडणूक आयोग वेगवेगळ्या माध्यमांतून प्रयत्न करत आहे. या अंतर्गत शैक्षणिक वर्तुळात एसव्हीईईपी उपक्रम हाती घेण्यात आला आहे. राज्य स्तरावर या उपक्रमात नाशिकचे योगदान उल्लेखनीय असल्याचा दावा शैक्षणिक विभागाने केला आहे. हा कार्यक्रम निवडणूक होईपर्यंत अखंड सुरू राहणार असल्याने शिक्षकांची जबाबदारी वाढली आहे.
एसव्हीईईपी अंतर्गत आतापर्यंत जिल्हा स्तरावर शाळा, महाविद्यालयांमध्ये पथनाट्य, जनजागृती फेरी यासह वेगवेगळे कार्यक्रम घेण्यात आले. सध्या शाळेत वार्षिक परीक्षा सुरू आहेत. परीक्षा सुरू असतांनाही विद्यार्थ्यांनी या उपक्रमात घेत मतदानाचा टक्का वाढावा यासाठी भित्तीपत्रक, घोषवाक्य, निबंध तसेच वेगवेगळे उपक्रम सुरू ठेवले आहेत. लवकरच शाळांना उन्हाळी सुट्टी सुरू होईल. त्यामुळे या उपक्रमासाठी विद्यार्थी मिळू शकणार नाहीत. या पार्श्वभूमीवर, उन्हाळी सुट्टीत शिक्षकांना बरोबर घेऊन, काही करता येईल काय, यासाठी बैठका घेण्यात येणार आहेत. नाशिक शिक्षण विभागाकडून १५ ते १८ एप्रिल या कालावधीत ठिकठिकाणी बैठका घेतल्या जाणार आहेत.
हेही वाचा…धुळ्यात भाजप, काँग्रेसमध्ये चुरशीची लढत ? शोभा बच्छाव यांच्या उमेदवारीनंतर जिल्हाध्यक्षांचा राजीनामा
याविषयी, शिक्षण अधिकारी उदय देवरे यांनी माहिती दिली. विद्यार्थ्यांना बरोबर घेऊन आठ एप्रिलपर्यंत जिल्ह्यात वेगवेगळे उपक्रम घेण्यात आले. परंतु, १० एप्रिलनंतर विद्यार्थ्यांना सुट्टी सुरू होईल. एक मे रोजी निकाल जाहीर होईल. या कालावधीत समाज माध्यमातून किंवा प्रत्यक्ष पध्दतीने मतदानाविषयी प्रबोधन करण्यावर भर देण्यात येणार आहे. कोणते उपक्रम राबवता येतील, याविषयी मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीत चर्चा करण्यात येणार आहे. याशिवाय मतदानाच्या आधीही काही सुट्ट्या आहेत. याचा मतदानावर परिणाम होऊ शकतो. या सर्व शक्यतांचा विचार करण्यात येणार असल्याचे देवरे यांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा सहभाग असलेला एसव्हीईईपी उपक्रम सुरु आहे.
हेही वाचा…नाशिक : जागा विकसित करण्याच्या बहाण्याने फसवणूक, सात जणांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला
बैठकांचे सत्र
१५ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता गंगापूर रोड येथील सीएमसीएस महाविद्यालयात नाशिक महानगरपालिका, पेठ, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, कळवण, दिंडोरी, सिन्नर, निफाड
१६ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता मालेगाव कॅम्प येथील काबरा विद्यालयात मालेगाव मनपा, येवला, नांदगाव
१७ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता चांदवड येथील नेमीनाथ जैन हायस्कूल येथे बागलाण, चांदवड, देवळा