“ज्यांना स्वप्न बघायला आवडतात, त्यांना…”, अनुपम खेर यांच्या प्रेरणादायी विचारांनी नेटकरी भारावले

नुकतंच त्यांनी सोशल मीडियावर प्रेरणादायी विचाराच्या ओळी शेअर केल्या आहेत.

anupam-kher
(File Photo)

बॉलिवूडचे दिग्गज अभिनेता अनुपम खेर यांची लोकप्रियता देशातच नाही तर जगभरात पसरली आहे. अनुपम खेर हे सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतात. आजवर अनुपम खेर यांनी वेगवेगळ्या भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. अनुपम खेर हे नेहमी सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतात. नुकतंच त्यांनी सोशल मीडियावर प्रेरणादायी विचाराच्या ओळी शेअर केल्या आहेत.

अनुपम खेर यांनी नुकतंच इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोवर काही प्रेरणादायी विचार लिहिले आहेत. “ज्यांना स्वप्न बघणे चांगलं वाटते, त्यांना रात्र छोटी वाटते. तर ज्यांना स्वप्न पूर्ण करणं चांगलं वाटतं त्यांना दिवस छोटा वाटतो,” अशा ओळी असलेला फोटो अनुपम खेर यांनी शेअर केला आहे.

हेही वाचा : ‘या’ कारणामुळे अमृताने आई न होण्याचा घेतला होता निर्णय

त्यांनी शेअर केलेल्या या फोटोला चाहत्यांनी लाखो कमेंट्स दिल्या आहेत. यावर नेटकऱ्याने लिहिले की, तुम्ही असंच लिहित रहा, दिवस चांगला जातोय, असे म्हटले आहे. तर दुसऱ्या युजरने म्हटले की, “पण आश्चर्याची गोष्ट आहे की दोघांचा समान वापर कसा करायचा हे कोणालाच माहिती नाही” असेही सांगितले आहे. ‘सर तुम्ही खूप सुंदर ओळी लिहिल्या आहेत.’ असेही एका युजर्सने म्हटले आहे.

हेही वाचा : ‘नाईट ड्रेस घालून आलीस का?’, कपड्यांमुळे करीना कपूर खान पुन्हा झाली ट्रोल

अनुपम खेर यांच्या या पोस्टला दहा हजारांहून अधिक लोकांनी लाईक्स केले आहे. दरम्यान याआधीही त्यांनी “जोपर्यंत तुम्हाला दिसेल त्या मार्गावर चालत जा. तिथे गेल्यावर पुढचा रस्ता दिसेल,” असेही एक प्रेरणादायी वाक्य शेअर केले होते. त्यावरही नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला होता.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Bollywood actor anupam kher wrote motivational line for users like it nrp

Next Story
चित्ररंग : फक्त जिस्मदर्शन