‘ब्रह्मास्त्र’ नुकताच प्रदर्शित झाला असून प्रेक्षक त्याला चांगलाच प्रतिसाद देत आहे. चित्रपटाने कमाइईदेखील चांगली केली आहे. रणबीर आणि आलिया यांच्या अभिनयाचं कौतुक होत आहे. बॉयकॉट ट्रेंडचा फटका बसूनही या चित्रपटाने केलेली कमाई पाहता बऱ्याच लोकांना आश्चर्याचा धक्काच बसला आहे. ‘ब्रह्मास्त्र’ हा फॅंटसी विश्वावर आधारित चित्रपट आहे. असे चित्रपट हॉलिवूडमध्ये भरपूर बनतात पण बॉलिवूडमध्ये असा प्रयोग आजवर झालेला नाही.

रणबीर ‘ब्रह्मास्त्र’च्या माध्यमातून अशा वेगळ्या धाटणीच्या चित्रपटात झळकला असला तरी याआधी त्याला हॉलिवूडच्या अशाच एका मोठ्या चित्रपटाची ऑफर आली होती जी त्याने नाकारली. तो चित्रपट होता ‘स्टार वॉर्स’. २०१६ साली समीक्षक राजीव मसंद यांना दिलेल्या मुलाखतीमध्ये रणबीरने याविषयी खुलासा केला आहे. रणबीर म्हणाला की, “या चित्रपटात मला दुसरी महत्त्वाची भूमिका दिली होती ज्यासाठी मला ऑडिशन द्यावी लागणार होती. मला कायम ऑडिशनची प्रचंड भीती वाटते त्यामुळे मी तेव्हा त्या चित्रपटाच्या ऑडिशनसाठी नकार दिला होता.”

नुकतंच ‘ब्रह्मास्त्र’च्या प्रमोशन दरम्यान रणबीरने याविषयी स्पष्टीकरण दिलं. त्याच्या म्हणण्याप्रमाणे त्याला कधीच हॉलिवूडची ओढ नव्हती. अयान मुखर्जी जी गोष्ट सांगू पाहत होता तीच त्याच्यासाठी महत्त्वाची होती. त्यामुळेच त्याने हा चित्रपट करण्यास नकार दिला. पुढे रणबीर म्हणाला की, “आपण आपल्या स्टार वॉर्सचं विश्व निर्माण करुयात, ती क्षमता अयान मुखर्जीमध्ये आहे. ‘स्टार वॉर्स’च्या फिल्ममेकर्सपरमणे तोदेखील तितकाच सक्षम आहे आणि माझी खात्री आहे की आम्ही तसा चित्रपट नक्की सादर करू.”

आणखी वाचा : ७०० कोटी बजेटमध्ये बनणारा महाभारतावरील चित्रपट प्रेक्षकांना 5D मध्ये पाहता येणार? जाणून घ्या

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नुकताच प्रदर्शित झालेला ‘ब्रह्मास्त्र’ हा काहींना आवडतोय तर काही त्यावर सडकून टीका करत आहेत. या चित्रपटातल्या स्पेशल इफेक्टची मात्र सगळेच तारीफ करत आहेत. ‘स्टार वॉर्स’ प्रमाणेच ‘ब्रह्मास्त्र’ला यश मिळतंय का ते मात्र येणारा काळच ठरवेल.