बॉलिवूडमधील प्रसिद्ध फॅशन डिझायनर मसाबा गुप्ता दुसऱ्यांदा विवाहबंधनात अडकली. मसाबा ही सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ता व विवियन रिचर्ड्स यांची मुलगी आहे. मसाबाने अभिनेता सत्यदीप मिश्राशी लग्नगाठ बांधली. त्यांनी कुटुंबीयांच्या उपस्थितीत लग्न केलं. या लग्नातील फोटो व्हायरल झाले आहेत. नीना गुप्ता यांनी लेकीचं लग्न झाल्यानंतर तिला सल्ले दिले आहेत.

नीना गुप्ता बॉलिवूड बेधडक अभिनेत्री म्हणून ओळखल्या जातात आणि त्या नेहमीच आपलं मत बिनधास्तपणे मांडताना दिसतात. लेकीच्या लग्नानंतर त्यांनी लग्नाबद्दल सल्ले दिले आहेत. आगामी ‘शिव शास्त्री बालबोआ’ चित्रपटाचे प्रमोशन करताना त्यांनी डीएनएशी बोलताना त्या असं म्हणाल्या, “लग्न इतकं सोपं नाही, प्रेम करणं सोपं आहे, पण प्रिय व्यक्तीबरोबर राहणं सोपं नाही. त्यामुळे तुम्हाला खूप तडजोडी कराव्या लागतील, नाहीतर ते चालणार नाही.”

शाहरुख सरांनी केलं तर…” शमिता शेट्टीबरोबरच्या ‘त्या’ कृतीवर आमिर अलीने अखेर सोडलं मौन

नीना गुप्ता पुढे म्हणाल्या, मी मसाबाला हेच सांगितले आहे. “तुम्ही समोरच्या व्यक्तीचा आदर केला पाहिजे, कारण फक्त प्रेम पुरेसे नाही. त्यानेही तुमचा आदर केला पाहिजे. आणि जर तुम्हाला वाटत असेल की तो आदर करत नाही. त्या व्यक्तीला तुमचा आदर करावा लागेल यासाठी तुम्हाला प्रयत्न केले पाहिजेत.” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

View this post on Instagram

A post shared by Neena Gupta (@neena_gupta)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, मसाबा व सत्यदीप गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना रिलेशनशिपमध्ये होते. मसाबाचं पहिलं लग्न मधू मंटेनाशी झालं होतं. पण काही वर्षांतच त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर आता सत्यदीपबरोबर संसार थाटत मसाबाने नव्या इनिंगला सुरुवात केली आहे.