अभिनेत्री राधिका आपटे ही तिच्या दमदार आणि हटके अभिनयासाठी ओळखली जाते. आजवर राधिकाने वेगवेगळ्या भूमिका साकारत स्वत:ची खास ओळख निर्माण केली आहे. हिंदीसह मराठी चित्रपटसृष्टीतही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. ती अनेक शोजमध्ये आपल्याला गेस्ट म्हणून देखील पाहायला मिळते. दरम्यान, राधिका सोशल मीडियावर देखील चांगलीच सक्रिय आहे. नुकताच तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर भाडिपासोबतचे काही फोटो शेअर केले आहेत. तिने हे फोटो एका खास कारणासाठी शेअर केले आहेत.

सुप्रसिद्ध असं मराठी युट्यूब चॅनेल ‘भारतीय डिजिटल पार्टी’ म्हणजेच ‘भाडिप’ने नुकताच एक मिलीयन सबस्क्रायबर्सचा टप्पा पूर्ण केला आहे. विशेष म्हणजे युट्यूबवर एक मिलीयनचा पल्ला गाठणारं हे पहिलं मराठी चॅनल ठरलं आहे. या चॅनलवर अनेक चित्रपट आणि नाट्यसृष्टीतील प्रसिद्ध आणि नामवंत चेहऱ्यांचा सहभाग असतो. या चॅनलच्या ‘कास्टिंग काऊच’ या धम्माल चॅट शोची पहिली गेस्ट ही राधिका आपटे होती. ‘भाडिप’च्या या यशानंतर राधिकाने या चॅनलचा प्रमुख सारंग साठे आणि पौला यांना शुभेच्छा दिल्या आहेत. तिने तिच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर करत कॅप्शन दिलं की, “भाडिपा एक मिलीयनसाठी खूप शुभेच्छा. तुम्ही खूप मस्तं आहात. अगदी सुरवातीपासुन तुम्ही मला तुमच्यात सामील करून घेतलंत, त्यासाठी थॅंक्यु.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Radhika (@radhikaofficial)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राधिकाने ही पोस्ट शेअर करताच सारंग साठेने तिच्या पोस्टवर कमेंट केली. त्याने लिहिलं आहे की, “खूप खूप प्रेम. यापेक्षा अजून छान गिफ्ट मिळू शकत नाही. ” दरम्यान निश्चितच ‘भाडिप’ने एक मोठं यश मिळवलं आहे. सारंग साठे, पौला यांनी खूप मेहनत घेउन सुरवात केली होती. ‘कास्टिंग काऊच’, ‘आई मी आणि…’ असे अनेक कार्यक्रमातुन प्रेक्षकांचे मनोरंजन करतात. त्याच्या वेगवेगळ्या कॉन्सेप्टसला प्रेक्षकांची मोठी पसंती आणि उस्फुर्त दाद मिळत असते. तर राधिका आपटेच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर ‘पार्चड’, ‘द वेडिंग गेस्ट’, ‘अंदाधुंद’, ‘काबुल’ सारख्या अनेक चित्रपटात प्रमुख भूमिकेत झळकली आहे. तसंच ती अनिल कपूर आणि विक्रांत मेस्सीसोबत ‘मनी हाइस्ट’चे एंथम ‘बेला चाओ’चे देसी व्हर्जनमध्ये दिसली होती. दरम्यान विशेष म्हणजे भाडिपाने वचनं दिलं होतं की एक मिलियनचा टप्पा पूर्ण झाल्यावर ते ‘आई मी आणि ..’ याचा नवीन भाग घेऊन येणार आहेत. त्यामुळे निश्चितच चाहते आता या नवीन भागाची आतुरतेने वाट पाहत आहेत.