बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर आणि तिचा प्रियकर आनंद अहूजा नुकतेच विवाहबंधनात अडकले. मुंबईत एका दिमाखदार सोहळ्यात या फॅशनिस्टाची लग्नगाठ बांधली गेली. साधारण महिनाभरापासूनच सोनमच्या लग्नाच्या चर्चांना माध्यमांमध्ये आणि चाहत्यांच्या वर्तुळात उधाण आलं होतं. अखेर आनंद आणि तिच्या कुटुंबांकडून त्यांच्या लग्नाची अधिकृत घोषणा करण्यात आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

८ मे रोजी सोनम आणि आनंदने शीख परंपरांनुसार एकमेकांना आयुष्यभराची साथ देण्याची वचनं दिली. मेहंदी सोहळ्यापासून रंगललेल्या त्यांच्या लग्नसोहळ्याची रंगत रिसेप्शनमध्येही पाहायला मिळाली. सोनमच्या लग्नाच्या निमित्ताने संपूर्ण कलाविश्वही एकत्र आल्याचं पाहायला मिळालं. कुठे कुटुंबांमध्ये असलेला वाद मिटत होता. तर कुठे मैत्रीची वेगळी समीकरणं आकारास येत होती. अशा या विवाहसोहळ्यामध्ये मुंबई पोलिसांपासून ते माध्यमांच्या प्रतिनिधींपर्यंत प्रत्येक व्यक्तीने सहकार्य केलं त्याच व्यक्तींचे आभार मानत खुद्द सोनमने सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. लग्नामध्ये लहानमोठ्या व्यवस्था पाहण्यापासून ते अगदी महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा सोनमने नावानिशी उल्लेख करत त्यांचे मनापासून आभार मानले आहेत.

वाचा : VIDEO: पहिल्या प्रेमाचा उल्लेख करताना धोनी मध्येच थांबला…म्हणाला बायकोला काहीही सांगू नका

सोनमने केलेली ही पोस्ट पाहून इतरांप्रती तिच्या मनात असणारी आदराची आणि आपुलकीची भावना समोर येत आहे. सोनमने आणखी एक पोस्ट करत आपल्या कुटुंबियांचेही आभार मानले आहेत. आपल्यावर आणि आपल्या पतीवर कुटुंबियांनी केलेलं प्रेम आणि त्यांची आतापर्यंत मिळालेली साथ या साऱ्यासाठीही सोनमने सर्वांचेच सहृदय आभार मानले आहेत.

 

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bollywood actress sonam kapoor ahuja thanked everyone who contributed in her wedding
First published on: 11-05-2018 at 15:18 IST