६४व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यांची घोषणा झाल्यापासूनच अभिनेत्री सोनम कपूरचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. त्याचं कारणही तसंच होतं. ‘नीरजा’ या चित्रपटासाठी सोनमला यंदाचा विशेष उल्लेखनीय पुरस्कार जाहीर झाला. याच राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचं दिल्लीतील विज्ञान भवनात नुकतच वितरण करण्यात आलं. तारे-तारकांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या दिमाखदार सोहळ्यात विजेत्या कलाकारांना राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी सोनमचाही विशेष उल्लेखनीय पुरस्काराने गौरव करण्यात आला. आपल्या कामाची दखल घेत इतका महत्त्वाचा पुरस्कार मिळाल्याचा आनंद सोनमच्या चेहऱ्यावर पाहायला मिळतच होता. पण, तिच्यापेक्षाही जास्त आनंदी व्यक्ती त्या ठिकाणी सोनमचं कौतुक करत होती.

राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळ्याच्या वेळी सोनमला पाठिंबा देण्यासाठी आणि तिचं कौतुक करण्यासाठी ‘पापा’ अनिल कपूर, आई सुनिता कपूर यांनीही हजेरी लावली होती. यांच्यासोबतच सोनमचा कथित प्रियकर आनंद अहुजासुद्धा विज्ञान भवनात उपस्थित होता. यावेळी सोनमला पुरस्कार मिळतेवेळी टाळ्या वाजवत आनंदने मोठ्या उत्साहात तिचं कौतुक केलं. याशिवाय सोनम-आनंदचे काही फोटोसुद्धा सोशल मीडियावर चर्चेत आले. त्यामुळे आता आनंद आणि सोनम येत्या काळात त्यांच्या नात्याविषयी कोणती अधिकृत घोषणा करतात का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

14

520

15

18

19

20

आनंद फक्त आपला मित्र असल्याचं सोनम आजवर सांगत आली आहे. पण, तिच्या या म्हणण्यावर बऱ्याचजणांचा विश्वास बसत नाहीये. सोनमच्या बऱ्याच कौटुंबिक कार्यक्रमांना आनंद नेहमीच हजेरी लावतो. याशिवाय बॉलिवूडच्या या फॅशनिस्टसोबतचे त्याचे फोटो आणि एकंदर या दोघांचं बॉण्डिंग पाहता सेलिब्रिटी कपल्सच्या यादीत यांच नावही समाविष्ट होईल यात शंकाच नाही.

21

national-awards-sonam-759