बॉलिवूड अभिनेते अभिनेत्रींचे फोटो सोशल मीडियावर कायमच व्हायरल होत असतात. मग ते चित्रपटाचे प्रमोशन असो किंवा एखाद्या पार्टीतले फोटो असो, त्यांच्या फोटोंवर नेटकरी कायमच कमेंट करत असतात. कलाकार आपले नवीन फोटो शेअर करतातच मात्र आपल्या बालपणीचे फोटोदेखील शेअर करत असतात. बॉलिवूडच्या एका प्रसिद्ध अभिनेत्रीने आईच्या वाढदिवसानिमित्त पोस्ट शेअर केली आहे.
दिग्गज अभिनेते अनिल कपूर यांची लेक सोनम कपूर सोशल मीडियावर सक्रीय असते. ती स्वतः एका मुलाची आई आहे मात्र तिने तिच्या आईसाठी पोस्ट शेअर केली आहे. ज्यात तिने आईचे काही फोटो शेअर केले आहेत. तिने कॅप्शनमध्ये लिहले आहे, “वाढदिवसाच्या शुभेच्छा ममा, तुला खूप प्रेम. तुझ्याबरोबरची मिठी, तुझ्या प्रेमाने आम्हाला वेढून घेणं यापेक्षा काहीच मोठं नाही. तुझी उपस्थिती असताना मला कायमच लहान मुलासारखं वाटतं. आणि त्याबद्दल मी कृतज्ञ आहे. लव्ह यू मामा.” अशा शब्दात तिने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
सुनीता कपूर या एकेकाळी मॉडेलिंग क्षेत्रात कार्यरत होत्या. त्यांनी १९८४ साली अभिनेते अनिल कपूर यांच्याबरोबर लग्नगाठ बांधली. या दोघांना तीन अपत्य असून २ मुली आणि एक मुलगा असा त्यांचा परिवार आहे. सुनीता कपूर ज्वेलरीच्या व्यवसायात आहेत.
दरम्यान सोनम कपूरने ‘निरजा’, ‘रांझणा’, ‘वीरे दी वेडिंग’, ‘प्रेम रतन धन पायो’ या चित्रपटांतून अभिनयाचा ठसा उमटवला आहे. सध्या सोनम मातृत्वाचा आनंद घेत आहे. सोनमने २०१८मध्ये आनंद अहुजाशी लग्नगाठ बांधत नव्या आयुष्याला सुरुवात केली. काही महिन्यांपूर्वीच सोनम व आनंद अहुजा आईबाबा झाले आहेत. ऑगस्ट महिन्याच सोनमने गोंडस बाळाला जन्म दिला. त्याचं नाव त्यांनी ‘वायू’ असं ठेवलं आहे.