शरीर आणि मन यांचं योग्य संतुलन हवं असेल तर व्यायाम आणि सुर्यनमस्कार करणं आवश्यक आहे. शरीराचं संतलुन आपण व्यायाम करुन साधू शकतो. परंतु मनाचं संतुलन राखण्यासाठी योगसाधना करणं गरजेचं आहे. म्हणूनच शारीरिक व मानसिक स्वास्थ मिळावे यासाठी नियमित व्यायाम आणि योगासने करण्याची गरज आहे. विशेष म्हणजे सध्या पाहायला गेलं तर आजची तरुण पिढीदेखील योगाभ्यासाला महत्व देत असल्याचं पाहायला मिळतं. त्यातच बॉलिवूडमध्ये असे काही सेलिब्रिटी आहेत, जे नियमितपणे योगा आणि व्यायाम करतात. यामध्ये बॉलिवूड अभिनेत्री आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतं.

१. शिल्पा शेट्टी –
बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी कायमच तिच्या फिटनेसकडे जाणीवपूर्वक लक्ष देत असल्याचं पाहायला मिळतं. शिल्पा बऱ्याच वेळा सोशल मीडियावर योग करतानाचे काही फोटो, व्हिडीओज शेअर करत असते. त्यामुळे फिटनेसच्या बाबतीत ती अनेकांची आयडियल आहे. शिल्पा नियमितपणे योग आणि व्यायाम करत असून तिच्या आयुष्यात योगला विशेष महत्त्व असल्याचं दिसून येतं. अनेक वेळा तिने फिट राहण्याचं सारं श्रेय तिने योगाला दिलं आहे. तिच्या जीवनामध्ये योगचं अनन्यसाधारण महत्व असल्याचं पाहायला मिळतं. अनेक वेळा तिने काही व्हिडीओजच्या माध्यमातून चाहत्यांना योगाचं प्रशिक्षणही दिलं आहे.

२. मलायका अरोरा
वय हा केवळ आकडा आहे हे अभिनेत्री मलायका अरोराकडे पाहिल्यानंतर लक्षात येतं. वयाची ४० ओलांडल्यानंतरही मलायका आज एखाद्या २५ वर्षाच्या तरुणीप्रमाणे भासते. मलायका नियमितपणे योगा करत असल्यामुळे ती आजही फिट आहे. अनेक वेळा मलायका सोशल मीडियावर तिच्या योगाचे आणि व्यायामाचे व्हिडीओ, फोटो शेअर करत असते.

३. बिपाशा बासू-
बॉलिवूडमधील फिटनेस फ्रीक या नावाने प्रसिद्ध असलेली बिपाशा बासू कायम तिच्या फिटनेसमुळे चर्चेत असते. बिपाशा नियमितपणे योगा करते. सोशल मीडियावरही ती तिच्या योगाचे तसेच एक्सरसाईजचे फोटो, व्हिडीओ शेअर करत असते. योगामध्ये कपालभाती, अनुलोम- विलोम, मंडूकासन हे बिपाशाचे आवडते योगा प्रकार आहेत.

४. आलिया भट्ट-
स्टुडंट ऑफ द इअर या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी आलिया भट्ट ही आज लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक असल्याचं समजलं आहे. कधी काळी प्रचंड हेल्दी असणारी आलिया आता फिट आणि स्लिम असल्याचं पाहायला मिळतं. आलियानेदेखील इतर अभिनेत्रींप्रमाणे योगाला महत्व दिलं आहे. आलिया आठवड्यातून २ वेळा अष्टांग योगा करते.त्यासोबतच ती मेडिटेशनही करते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

५. कविता कौशिक –
चंद्रमुखी चौटाला या नावाने घराघरात पोहोचलेली कविता कौशिकलादेखील योगाची प्रचंड आवड आहे. कविता ३८ वर्षांची असून गेल्या अनेक वर्षांपासून ते योगा करत आहे.