नवनवीन उपकरणं आणि मोठ्या ब्रॅण्डचे फोन वापरण्यासाठी अनेकजण नेहमीच उत्सुक असतात. सध्या अशाच पद्धतीचं उत्साही वातावरण बॉलिवूडमध्ये पाहायला मिळत आहे. सेलिब्रिटींच्या या उत्साही वातारणामागचं कारण आहे ‘आयफोन एक्स’. स्मार्टफोनची पुढची अवृत्ती म्हणून ओळखला जाणारा बहुप्रतिक्षित ‘आयफोन एक्स’ अखेर भारतीय बाजारपेठेत दाखल झाला. हा फोन घेण्यासाठी अॅपलच्या दुकानांमध्ये अनेकांनीच गर्दी केल्याचेही पाहायला मिळाले. आपल्या हातात हा महागडा फोन यावा अशी अनेकांचीच इच्छा होती. यामध्ये अगदी बॉलिवूड सेलिब्रिटींचाही समावेश आहे.
आयफोनकडे एक ‘स्टेटस सिम्बॉल’ म्हणूनही पाहिलं जातं. त्यामुळे सेलिब्रिटींनी न चुकता हा फोन बुक केल्याचं पाहायला मिळत आहे. ट्विटरवरही अॅपलच्या या अद्वितीय फोनच्या चर्चा सुरु असतानाच अनिल कपूर, रितेश देशमुख, करण जोहर यांनीही आयफोन घेतल्याचा आनंद व्यक्त केला. करण जोहरने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरुन ‘इत्तेफाक’ या चित्रपटाचा उल्लेख करत, हा तर निव्वळ योगायोग असं म्हणत त्याच्या आयफोनचा फोटो पोस्ट केला. तर रितेशनेसुद्धा मोठ्या कलात्मक पद्धतीने ट्विट करत आयफोनचा फोटो पोस्ट केला. अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि शिल्पा शेट्टीने इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन फोटो पोस्ट करत हा फोन मिळाल्याचा आनंद व्यक्त केला आहे.
Tryin the amazing selfie camera of my #iphonex with my fav posing partner..& we end up laughin at each other’s stupid faces @NupurSanon pic.twitter.com/1NxeGiqcFn
— Kriti Sanon (@kritisanon) November 5, 2017
So excited to get my hands on this beauty! There go my plans for an early night #iPhoneX pic.twitter.com/7iLZgP4Ac3
— Anil Kapoor (@AnilKapoor) November 5, 2017
Happiness!! #iPhoneX pic.twitter.com/r2cFknpOeU
— Abhishek ???????? (@juniorbachchan) November 4, 2017
https://twitter.com/karanjohar/status/926327472223797248
My current & my ‘X’. #iPhoneX pic.twitter.com/763rtIrVao
— Riteish Deshmukh (@Riteishd) November 5, 2017
आयफोन एक्सच्या निमित्ताने एक लाखांहून जास्त किमतीचा फोन भारतीय बाजारपेठेत पहिल्यांदाच दाखल झाला आहे. अॅपल कंपनीतर्फे बाजारात आणल्या जाणाऱ्या प्रत्येक वस्तूबद्दल अनेकांमध्ये कमालीची उत्सुकता पाहायल मिळते. त्यातही आयफोन म्हणजे अनेकांच्या जिव्हाळ्याचा विषय. त्यामुळे याविषयीची उत्सुकता आणि चर्चा सध्या अनेकांचे लक्ष वेधत आहे. सध्या लाँच करण्यात आलेला आयफोन हा दोन आवृत्तींमध्ये बाजारपेठांमध्ये दाखल झाला आहे. यामध्ये ६४ जीबी क्षमतेच्या आयफोनची किंमत ८९ हजार रुपये आहे, तर २५६ जीबी क्षमतेच्या आयफोनची एक लाख दोन हजार रुपये आहे.
वाचा : अभिनयाव्यतिरिक्त बॉलिवूडकरांचे ‘हे’ आहेत ‘इन्कम सोर्स’