वादाच्या भोवऱ्या अडकलेल्या ‘पद्मावत’च्या प्रद्रर्शनाकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले होते. अॅडव्हान्स बुकिंग म्हणून नका किंवा मग चित्रपटाचे स्पेशल स्क्रीनिंग. कोणत्याही मार्गाने हा चित्रपट पाहण्यासाठी अनेकांनीच उत्सुकता व्यक्त केली आहे. पण, या उत्साही वातावरणात चित्रपटाच्या तिकीटाचे दर अवाक् करत आहेत. सर्वाधिक चर्चेत असणाऱ्या ‘पद्मावत’च्या तिकीटांच्या दरांमध्ये कमालीची वाढ झाली असून, साधारण ५०० रुपयांपर्यंत असणारा हा आकडा आता थेट २४०० रुपयांवर जाऊन पोहोचला आहे. भारतामध्ये इतक्या जास्त दरात तिकीट उपलब्ध असणारा ‘पद्मावत’ हा पहिला चित्रपट ठरत असल्याचे म्हटले जात आहे.

‘बॉलिवूड लाइफ’ आणि काही इतर संकेतस्थळांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबई- गोवा विमानप्रवासाहूनही भन्साळींच्या या ड्रीम प्रोजेक्टच्या तिकीटाचे दर जास्त असल्याचे आढळले. मुख्य म्हणजेच तिकीटाचे दर पाहून प्रेक्षक अवाक् होत असले तरीही त्यांनी चित्रपट पाहण्याची इच्छा व्यक्त केली आहे. अॅडव्हान्स बुकिंगच्या उपलब्धतेमुळे या चित्रपटाच्या पहिल्याच दिवशी काही चित्रपटांमध्ये हाऊसफुल्लचे बोर्ड पाहायला मिळाले. एकिकडे करणी सेनेचा विरोध आणि दुसरीकडे चित्रपटाला मिळणारा प्रतिसाद अशीच परिस्थिती सध्या पाहायला मिळत आहे.

आमचे कामच ‘त्यांना’ सडेतोड उत्तर देईल- दीपिका पदुकोण

प्रजासत्ताक दिन, आठवड्याचा शेवट अशी ऐन मोठी सुट्टी आणि प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबद्दल झालेली वातावरणनिर्मिती या साऱ्यामुळे चित्रपटाच्या तिकीट दरांमध्ये वाढ झाल्याचे म्हटले जातेय. मुख्य म्हणजे चाहत्यांनी मात्र त्यांच्या खिशाला कात्री बसत अली तरीही ‘पद्मावत’ पाहण्याचा नाद मात्र सोडला नाहीये हेच खरे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चित्रपटाच्या तिकिटांचे दर खालीलप्रमाणे-
दिल्ली, डायरेक्टर्स कट अॅम्बियन्स – २४०० रुपये
मुंबई, आयनॉक्स नरिमन पॉईंट – १५५० रुपये
मुंबई, आयनॉक्स वरळी – १५५० रुपये
ठाणे, सिनोपोलिस व्हिव्हियाना मॉल – १००० रुपये
मुंबई, पीव्हीआर वर्सोवा – १०३० रुपये
पुणे, आयनॉक्स बंड गार्डन – ७८० रुपये