दिलीप ठाकूर
रागावलेल्या प्रेयसीची प्रियकर छान गाणे गात समजूत घालतोय असा प्रसंग आपण अनेक चित्रपटातून पाहत आलोय. कधी नायक फारच व्याकुळ होतो तर कधी अधिकच हिंमत दाखवतो. तो जर ही-मॅन धर्मेंद्र असेल तर? सुभाष देसाई निर्मित व मनमोहन देसाई दिग्दर्शित ‘धरम-वीर’ (१९७७) मधील या गाण्यात धरम (अर्थात धर्मेंद्र) रागावलेल्या राणीची (झीनत अमान) समजून किती घालतो आणि गाता गाता तिला धमकावतो किती हे समजणे वा सांगणे अवघड आहे. मनमोहन देसाई यांचा चित्रपट म्हणजे अशी अतिशोयोक्ती हवीच.
ओ मेरी महबूबा, महबूबा, महबूबा
तुझे जाना है तो जा, तेरी मर्ज़ी मेरा क्या
पर देख तू जो रूठ कर चली जाएगी
तेरे साथ ही मेरे मरने की ख़बर आएगी
जो भी हो मेरी इस प्रेम-कहानी का
पर क्या होगा तेरी मस्त जवानी का
आशिक़ हूँ मैं तेरे दिल में रहता हूँ
अपनी नहीं मैं तेरे दिल की कहता हूँ
तौबा-तौबा फिर क्या होगा
कि बाद में तू इक रोज़ पछताएगी
ये रुत प्यार की जुदाई में ही गुज़र जाएगी
ओ मेरी मेहबूबा…
एका डोंगराळ निसर्गरम्य ठिकाणी ही त्यांच्या ‘प्रेमातील भानगड’ आहे. धरम रानावनात भटकतोय. प्राणी-पक्ष्यांच्या सहवासात रमलाय. तर ती महालातील राणी आहे. या दोघांचे सूत जमले कुठे असे प्रश्न मसालेदार मनोरंजक चित्रपटाच्या बाबतीत करायचे नसतात. राणी म्हणून झीनत अमान छान सजलीय, शोभलीय आणि प्रेयसी म्हणून तितकीच छान रागावलीयही. राणी घोड्यावर बसून निघालीय. धरम मात्र तिला समजवण्याचे विविध प्रकार करतोय. झाडावर चढून गळ्याला फास लावण्याचे उत्तम नाटकही वठवतो. कसेही करून त्याला तिला प्रभावित करायचयं.
तेरी चाहत मेरा चैन चुराएगी
लेकिन तुझको भी तो नींद ना आएगी
मैं तो मर जाऊँगा लेकर नाम तेरा
नाम मगर कर जाऊँगा बदनाम तेरा
तौबा-तौबा फिर क्या होगा
कि याद मेरी दिल तेरा तड़पाएगी
मेरे जाते ही तेरे आने की ख़बर आएगी
ओ मेरी महबूबा…
दीवाना मस्ताना मौसम आया है
ऐसे में तूने दिल को धड़काया है
माना अपनी जगह पे तू भी क़ातिल है
पर यारों से तेरा बचना मुश्किल है
तौबा-तौबा फिर क्या होगा
फिर प्यार में नज़र जब टकराएगी
तड़पती हुई मेरी जान तू नज़र आएगी
ओ मेरी महबूबा…
अशातच तेथून वरात चाललीय. डोलीत नवरी बसलीय आणि तिच्या प्रियकराला अडवलयं, त्याला मारले जातेय. धरम आता त्या मारखाऊ प्रियकराच्या जागी स्वतःला पाहतो तर त्या नवरीच्या जागी राणीला पाहतोय. हा कल्पनाविलास गाण्यात रंग भरतो. आनंद बक्षींचे गीत व लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्या संगीतातील साठ-सत्तर-ऐंशी अशा तीन दशकात बरीच गाणी लोकप्रिय आहेत. त्यातील हे एक. विशेष म्हणजे दिग्दर्शक मनमोहन देसाई मोहम्मद रफीकडून बरीच गाणी गाऊन घेत. रफी या गाण्यात मनसोक्त गायलाय. आणि धरमच्या भूमिकेतील धर्मेंद्रने त्याच जोशात ते सादर केलेय (वीरच्या भूमिकेत जीतेंद्र होता). या छान रंगलेलेल्या गाण्याच्या शेवटी प्रेयसीचे ह्रदय परिवर्तन होतेच.