आजकाल किसिंग सीन व बोल्ड सीन नसलेले चित्रपट क्वचितच असतात. बरेचदा बोल्ड कंटेंट असलेले चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करतात. पण सर्वाधिक किसिंग सीन असलेला एक चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपशेल आदळला होता. या फ्लॉप चित्रपटात बोल्ड व किसिंग सीनचा भरमार होता, पण तरीही चित्रपटाने वाईट कामगिरी केली होती. तसेच या चित्रपटाला आयएमडीबीवर वाईट रेटिंग मिळाले होते.

अभिनेता इमरान हाश्मीची बॉलीवूडचा सिरीयल किसर अशी ओळख आहे. त्याने त्याच्या करिअरमध्ये अनेक चित्रपटांमध्ये किसिंग सीन दिले आहेत. त्यामुळे किसिंग सीन म्हटलं की तो इमरानचा चित्रपट असेल, असं वाटतं. पण तसं नाही. या चित्रपटात इमरान हाश्मीची को-स्टार सोनल चौहान व नील नितीन मुकेश मुख्य भूमिकेत होते आणि सिनेमात तब्बल ३० किसिंग सीन होते.

चित्रपटाचे नाव काय?

या चित्रपटाचे नाव ‘3G अ किलर कनेक्शन’ असं आहे. हा एक हॉरर थ्रिलर चित्रपट होता. हा चित्रपट १२ वर्षांपूर्वी २०१३ साली रिलीज झाला होता. यामध्ये अभिनेता नील नितिन मुकेश व अभिनेत्री सोनल चौहान यांनी मुख्य भूमिका केल्या होत्या. हा चित्रपट बोल्ड व किसिंग सीनमुळे खूप चर्चेत राहिला होता.

३० किसिंग सीनने मोडलेला मर्डरचा ‘रेकॉर्ड’

3G चित्रपटात १०-२० नव्हे तब्बल ३० किसिंग सीन होते. या चित्रपटाने इमरान हाश्मी व मल्लिका शेरावत यांच्या ‘मर्डर’मधील किसिंग सीनचा रेकॉर्ड मोडला होता. कारण ‘मर्डर’ सिनेमात २० किसिंग सीन होते. भरमसाठ बोल्ड सीन असलेल्या या चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली होती.

3g-a-killer-connection-kissing-scenes
चित्रपटातील सीन (फोटो- ट्रेलरमधून स्क्रीनशॉट)

3G ला IMDb किती रेटिंग मिळाले होते?

‘3G अ किलर कनेक्शन’ चित्रपटावर प्रचंड टीका झाली होती. हा चित्रपट अत्यंत वाईट असल्याचं लोकांचं म्हणणं होतं. आयएमडीबीवरही या चित्रपटाला वाईट रेटिंग मिळाले होते. आयएमडीबीने या सिनेमाला ३.६ रेटिंग दिले होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला होता. जगभरात या सिनेमाने फक्त ५.९ कोटी रुपयांची कमाई केली होती.

‘3G अ किलर कनेक्शन’ या चित्रपटाचं दिग्दर्शन शांतनू राय छिब्बर व शिर्षक आनंद यांनी केलं होतं. त्यांनीच या चित्रपटाची कथा लिहिली होती. हा चित्रपट १२३ मिनिटांचा आहे. तो जगभरात १५ मार्च २०१३ रोजी प्रदर्शित झाला होता, पण बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला होता. हा चित्रपट युट्यूबर उपलब्ध आहे.