मध्यंतरी एका लाईव्ह शोदरम्यान ढिसाळ व्यवस्थापनामुळे ए आर रेहमान चांगलेच चर्चेत आले होते. आता पुन्हा रहमान चर्चेत आले आहेत ते एका वेगळ्याच कारणासाठी. ज्येष्ठ संगीत दिग्दर्शक एआर रेहमान यांनी असोसिएशन ऑफ सर्जन ऑफ इंडियाला (ASICON) कायदेशीर नोटीस पाठवली आहे.

रेहमान यांनी असोसिएशनवर वार्षिक परिषदेत आपल्या नावाची बदनामी केल्याचा आरोप केला आहे. रेहमान यांनी मानहानीसाठी १० कोटी रुपयांची भरपाईदेखील मागितली आहे. यावर ASICON ने आरोप केला आहे की २०१८ मध्ये, रहमान संस्थेच्या ७८ व्या वार्षिक संमेलनात परफॉर्म करणार होते, परंतु ते उपस्थित राहू शकले नाहीत. यासाठी रेहमान यांनी एडवांस म्हणून घेतलेले २९.५ लाख रुपयेही परत केलेले नाहीत.

sanjay raut narendra modi
“…त्यांनी मंगळसुत्रांची उठाठेव करू नये”, राऊतांची पंतप्रधानांवर टीका; म्हणाले, “काश्मीरमध्ये मोदीपुरस्कृत दहशतवाद्यांनी…”
Imtiaz Ali on Amar Singh Chamkila caste
चित्रपटात चमकीला यांच्या जातीचा वारंवार उल्लेख, इम्तियाज अली म्हणाले, “त्यामुळेच त्यांनी आपला जीव गमावला, कारण…”
girish mahajan statement on bjp mp unmesh patil
खासदार उन्मेश पाटील यांना चुकीची जाणीव होईल; गिरीश महाजन यांचा सूचक इशारा
randeep surjewala made controversial remarks on hema malini
हेमा मालिनी यांच्याबाबत रणदीप सुरजेवालांचं वादग्रस्त वक्तव्य, कंगनाची तिखट शब्दांत प्रतिक्रिया, “द्वेष आणि तिरस्कार..”

आणखी वाचा : ‘OMG 2’चे दिग्दर्शक यांनी ‘CBFC’ला म्हंटलं ढोंगी; म्हणाले, “रॉकी और रानीमधील किसिंग…”

एआर रेहमान यांची वकील नर्मदा संपत यांनी चार पानी उत्तर देत मात्र हे आरोप फेटाळून लावले आहेत. न्यायालयात सादर केलेल्या नोटिसमध्ये एआर रेहमानने असोसिएशनशी कधीही कोणताही करार केला नसल्याचे म्हटले आहे. मात्र तरीही प्रसिद्धीसाठी त्यांची प्रतिष्ठा मलिन करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं सांगितलं आहे. इतकंच नव्हे तर रेहमान यांना यासाठी एडवांस म्हणून कोणतीही रक्कम मिळाली नसल्याचा दावा यात करण्यात आला आहे.

याबरोबरच रेहमान यांच्यावर जे आरोप लावले जात आहेत ते केवळ मीडियाचं लक्ष वेधून घेण्यासाठी केलं जात असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे ASICON ने रहमान यांची जाहीर माफी मागावी अशी मागणी नर्मदा संपत यांनी केली आहे. याबरोबरच रेहमान यांना १५ दिवसांच्या आत १० कोटी रक्कम द्यावी असंही नोटिसमध्ये नमूद करण्यात आलं आहे.