बॉलीवूडच्या किंग खानचा बहुप्रतिक्षित ‘जवान’ चित्रपटाने दमदार सुरुवात केली आहे. प्रदर्शित होताच या चित्रपटाने नवे रेकॉर्ड बनवले आहेत. ओपनिंग डेला ‘जवान’ने इतिहास रचला आहे. या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जननं पहिल्याच दिवशी ६५ कोटींची कमाई केली आहे. कमाईत या चित्रपटाने अनेक रेकॉर्ड मोडले आहेत.

हेही वाचा- ‘जवान’ने रविवारी रचला इतिहास! चौथ्या दिवशी केली जबरदस्त कमाई; ‘पठाण’सह ‘KGF 2’, ‘बाहुबली २’ चा रेकॉर्ड मोडला, वाचा आकडे

Emergency, Kangana Ranaut, Censor Board,
‘इमर्जन्सी’ चित्रपटातील दृश्यांना कात्री लावण्यास सहनिर्माती कंगना राणावत तयार, सेन्सॉर मंडळाची उच्च न्यायालयात माहिती
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
50 crore turnover of re-release films in two months
पुनःप्रदर्शित चित्रपटांची दोन महिन्यांत ५० कोटींची उलाढाल
vivek agnihotri instagram
मॅनेजर उद्धट वागल्याने मुख्य अभिनेत्याला चित्रपटातून काढलं, विवेक अग्निहोत्रींचा खुलासा; म्हणाले, “स्टार किडच्या…”
kiran rao
ऑस्करमध्ये भारतीय महिलांचा जलवा; किरण रावच नव्हे, तर ‘या’ महिला दिग्दर्शकांच्या चित्रपटांनाही मिळाली होती एन्ट्री
Festival of Italian films at the Regal movie theater Cinema Paradiso
‘रीगल’मध्ये इटालियन चित्रपटांचा महोत्सव; रसिकांना विनामूल्य पाहण्याची संधि
Singer Dhvani Bhanushali acting debut
गायिका ध्वनी भानुशालीचे अभिनय क्षेत्रात पदार्पण
National Film Day, Navra Maza Navsacha 2,
‘राष्ट्रीय चित्रपट दिना’चा मुहूर्त फळला, ‘नवरा माझा नवसाचा २’सह सगळ्याच चित्रपटांचे शो ८० ते ९० टक्के हाऊसफुल

दरम्यान चित्रपटाचा दिग्दर्शक एटलीने मुंबईत भारतीय सेनेच्या जवानांसाठी स्पशेल स्क्रीनिंगचे आयोजन केले होते. या स्पशेल स्क्रीनिंगमध्ये जवानांबरोबर त्यांचे कुटुंबीयही सहभागी झाले होते. मुंबईत चित्रपटगृहामध्ये या स्पशेल स्क्रीनिंगचे आयोजन करण्यात आले होते.

चित्रपटाच्या कमाईबाबत बोलायचं झालं तर प्रदर्शनाच्या चौथ्या दिवशी म्हणजेच रविवारी ‘जवान’ने ८१ कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. ‘जवान’ची चार दिवसांची एकूण कमाई आता २८७.०६ कोटींवर पोहोचली आहे. कमाईच्या बाबतीत जवानने ‘पठाण’चा रेकॉर्ड मोडला आहे. एवढच नाही तर चित्रपटाने ‘केजीएफ २’, ‘गदर २’, ‘बाहुबली २’ अशा अनेक चित्रपटांना मागे टाकलं आहे.

हेही वाचा- शाहरुख खानच्या ‘जवान’बद्दलची ‘ही’ ४ सिक्रेट्स तुम्हाला ठाऊक आहेत का? जाणून घ्या

याच गतीने चित्रपटाची कमाई सुरू राहिली तर या आठवड्याच्या शेवटी चित्रपट ५०० कोटींची कमाई करेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. शाहरुख खान, नयनतारा, विजय सेतुपती, सान्या मल्होत्रा, रिद्धी डोग्रा यांच्या भूमिका असलेला हा चित्रपट एकूण किती करणार याकडे सगळ्यांच लक्ष लागलं आहे.