आमिर खानची मुलगी आयरा खान अखेर लग्नबंधनात अडकली आहे. २६ वर्षीय आयराने बुधवार (३ जानेवारी २०२४ रोजी) जिम ट्रेनर नुपूर शिखरेशी लग्नगाठ बांधली. दोघांनी नोंदणी पद्धतीने लग्न केलं. आयरा व नुपूरच्या लग्नानंतर चाहते त्यांच्याबाबत जाणून घेण्यास खूप उत्सुक आहेत. सगळीकडे त्यांचीच चर्चा आहे.

आयरा ही आमिर खान व रीना दत्ता यांची मुलगी आहे. तिला जुनैद खान नावाचा मोठा भाऊ आहे. जुनैद ३० वर्षांचा आहे, तर आयरा २६ वर्षांची आहे. आयराचा पती नुपूर हा तिच्यापेक्षा तब्बल १२ वर्षांनी मोठा आहे. नुपूरचा जन्म १७ ऑक्टोबर १९८५ रोजी झाला होता. तो ३८ वर्षांचा आहे आणि सर्टिफाईड फिटनेस ट्रेनर आहे. त्याने आमिर, सुश्मिता सेन आणि इतर अनेक बॉलीवूड सेलिब्रिटींना ट्रेनिंग दिले आहे.

Video: नुपूर शिखरेला लग्नात शॉर्ट्स अन् बनियनवर पाहून आयरा खान म्हणाली, “Good Bye…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आयरा आणि नुपूर यांनी ३ जानेवारी रोजी नोंदणी पद्धतीने लग्न केलं. आता उदयपूरला त्यांचा विधिवत विवाहसोहळा होणार असल्याचं म्हटलं जातंय. हा लग्नसोहळा खूप खासगी असेल, ज्याला फक्त जवळचे मित्र आणि कुटुंबातील सदस्य उपस्थित असतील. वधू आणि वरांनी पाहुण्यांना त्यांच्यासाठी कोणतीही भेटवस्तू न घेण्याची विनंती केली आहे.