बॉलीवूडचा सुपस्टार आमिर खान नेहमी चर्चेत असतो. आमिरप्रमाणेच त्याची मुलगी आयराही चर्चेत असते. अनेकदा आयराने आपल्या मानसिक आरोग्याबाबत मोकळेपणाने भाष्य केलं आहे. आयरा मानसिक आरोग्याबाबतही खूप जनजागृतीही करताना दिसते. नुकतंच आयराने तिचं आई-वडिलांबरोबर असलेल्या नात्याबद्दल भाष्य केलं आहे.
हेही वाचा- राष्ट्रीय पुरस्कार जिंकल्यावर आलिया भट्टने खरेदी केली आलिशान गाडी, किंमत ऐकून व्हाल थक्क
नुकत्याच एका मुलाखतीत आयराने वडील आमिर खानबरोबरच्या तिच्या नात्याबद्दल मोकळेपणाने भाष्य केलं आहे. मुलाखतीत आयराला विचारण्यात आले की, तुझ्या लहानपणी आमिर तुझ्याबरोबर नव्हता याचा तुमच्या नात्यावर परिणाम झाला का? या प्रश्नाला उत्तर देताना आयरा म्हणाली, ‘माझ्या आई-वडिलांबरोबर माझे नाते असे आहे की ज्यावर मला खूप काम करावे लागले आहे. कारण तुमच्या पालकांशी असलेले नाते हे सर्वात मजबूत नाते आहे. आपल्या आई-वडिलांसोबतचे नाते हे सर्वात गुंतागुंतीचे नाते असते. कारण तुम्हाला त्यांची सर्वात जास्त काळजी असते. या नात्यासाठी खूप वेळ द्यावा लागतो पण हे नात तुम्हाला सगळ्यात जास्त आनंदही देतं.”
आयरा पुढे म्हणाली, ‘मला वाटतं की, माझ्या आईबरोबरचा माझा संवाद माझ्या वडिलांच्या तुलनेत थोडा सोप्पा आहे, पण मी त्या दोघांशीही मोकळेपणाने बोलते. माझ्या मनात सतत विचार येत राहतो की माझे वडील नेहमी व्यस्त असतात. पण त्यांनी मला सांगितलं आहे की जेव्हा तुला माझी गरज असले मला फोन कर. सध्या माझी आईही खूप व्यस्त आहे. ती तिच्या आई-वडिलांची काळजी घेत आहे.
हेही वाचा- आमिर खान मुंबई सोडून ‘या’ शहरात होणार शिफ्ट; ‘हे’ आहे मोठं कारण
आयरा लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. १८ नोव्हेंबर २०२२ रोजी आयराने फिटनेस ट्रेनर नुपूर शिखरेबरोबर साखरपुडा केला होता. आता आयरा आणि नुपूर ३ जानेवारी २०२४ ला लग्न करणार आहेत. काही दिवसांपूर्वीच आमिरने आयरा आणि नुपूरच्या लग्नाची तारीख जाहीर केली होती.