scorecardresearch

Premium

Video: “आत्महत्येचा विचार…”, आमिर खानच्या लेकीने केलं स्पष्ट भाष्य, आयराचा व्हिडीओ चर्चेत

मध्यंतरी एका पोस्टमधून तिने गेल्या काही वर्षांपूर्वी डिप्रेशनचा सामना केला असल्याचं सांगितलं. तर नुकतंच आत्महत्या या विषयावर भाष्य केलं.

iran khan, aamir khan

बॉलीवूड अभिनेता आमिर खानची मुलगी आयरा खान मनोरंजसृष्टी नसली तरीही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियावर सक्रिय राहून ती तिच्या आयुष्याबद्दलच्या गोष्टी उघडपणे तिच्या चाहत्यांशी शेअर करत असते. मध्यंतरी एका पोस्टमधून तिने गेल्या काही वर्षांपूर्वी डिप्रेशनचा सामना केला असल्याचं सांगितलं. तर नुकतंच आत्महत्या या विषयावर भाष्य केलं.

काल जागतिक आत्महत्या प्रतिबंधक दिन होता. यानिमित्त तिने आत्महत्या न करण्याबाबत जनजागृती केली. काल मुंबईतील एका कॅफे समोर ती पापाराझींना दिसली. यावेळी तिने आत्महत्या या विषयावर बोलत सर्वांना सावध केलं.

After Shreyas Iyer was ruled out of Ranji Trophy 2024 due to back pain, the NCA made waves the next day by declaring him fit.
Ranji Trophy 2024 : रणजीपासून दूर राहण्यासाठी श्रेयसची पाठदुखीची खोटी तक्रार? एनसीएकडून पूर्णपणे तंदुरुस्त घोषित
Alexei Navalny Death
अलेक्सी नवाल्नींची शक्ती अन् प्रेरणास्थान राहिलीय ‘युलिया; पतीच्या मृत्यूनंतर पत्नीची पहिली पोस्ट चर्चेत
woman committed suicide with her two-month-old baby connection with Postpartum depression
‘तिनं असं का केलं…?’
do Vyaghrasana know its health benefits
Vyaghrasana Yoga : तासन् तास बसून काम करत असल्यामुळे पाठदुखी व कंबरदुखीचा त्रास वाढलाय? मग व्याघ्रासन योगा करा

आणखी वाचा : “माझा मानसिक आजार हा अनुवंशिक…”, आमिर खानच्या लेकीचा मोठा खुलासा, इरा म्हणाली, “आई-वडिलांकडून…”

ती म्हणाली, “आज सुसाईड प्रिव्हेन्शन डे आहे. म्हणजेच आत्महत्या करण्यापासून एखाद्याला रोखण्याचा दिवस. आत्महत्या हा विचार खूप भयानक आहे आणि याबद्दल लोक कोणाला सांगू शकत नाहीत. पण जर तुम्ही त्यांना याबद्दल विचारलं तर एक विश्वास वाटेल की कोणीतरी आहे ज्याच्याशी मी याबद्दल बोलू शकतो. अनेकांना वाटतं की जर आपण त्यांच्याशी या विषयावर बोललो तर त्यांच्या मनात आत्महत्येचे विचार येतील पण तसं होत नाही.”

हेही वाचा : “आमिर खानने मला दिवसभर किस करायला लावलं…”, ‘हम हैं राही प्यार के’ फेम अभिनेत्रीने सांगितला शूटिंगदरम्यानचा किस्सा

तर तिचा हा व्हिडीओ आता खूप चर्चेत आला असून त्यावर कमेंट करत नेटकरी सकारात्मक प्रतिक्रिया देत आहेत. तर ती करत असलेल्या जनजागृतीबद्दल अनेक जण तिचं कौतुकही करत आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Aamir khan daughter ira khan opens up about suicide on suicide prevention day rnv

First published on: 11-09-2023 at 11:18 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×