अभिनेता आमिर खानची लेक आयरा खानच्या लग्नाची तारीख ठरली आहे. महत्त्वाचं म्हणजे खुद्द आमिरनेच आयराचं लग्न कधी होणार याबाबत माहिती दिली आहे. आयरा व नुपूर शिखरे यांनी १८ नोव्हेंबर २०२२ रोजी साखरपुडा केला होता. आता वर्षभराने दोघेही लग्नबंधनात अडकतील. दोघांचं लग्न नवीन वर्षात म्हणजेच २०२४ मध्ये होणार आहे, असं आमिरने सांगितलं आहे.

आमिर खान लेकीसह अनेक वर्षांपासून घेतो थेरपी, मानसिक आरोग्य दिनानिमित्त केला खुलासा, म्हणाले, “भावनिक मदतीची…”

‘न्यूज १८ इंडिया’शी बोलताना आमिरने मुलीच्या लग्नाची तारीख सांगितली. इतकंच नाही तर त्याने होणाऱ्या जावयाचं तोंडभरून कौतुकही केलं. “आयरा ३ जानेवारीला लग्न करणार आहे. मुलगा तिने निवडलेला आहे. खरं तर त्याचं निकनेम पोपोये आहे, तो ट्रेनर आहे. त्याचे नाव नुपूर आहे. तो खूप छान मुलगा आहे. जेव्हा आयरा नैराश्याशी लढत होती, तेव्हा तो तिच्यासोबत होता. तो खरोखरच तिच्या पाठीशी उभा राहिला आणि तिला भावनिक आधार दिला. मला आनंद आहे की तिने एक असा मुलगा निवडला ज्याच्याबरोबर ती खूप आनंदी आहे. ते खूप कनेक्टेड आहेत. ते एकमेकांची खूप काळजी घेतात,” असं आमिर म्हणाला.

दिग्गज अभिनेत्रीची फ्लॉप मुलगी; आमिर खानसह केलं काम, एका हिट गाण्याने बनली स्टार पण करिअर संपलं, कारण…

“हा फिल्मी डायलॉग वाटू शकतो पण नुपूर मला माझ्या मुलासारखा वाटतो. तो खूप चांगला मुलगा आहे, आम्हाला वाटतं की तो कुटुंबाचा एक भाग आहे. त्याची आई प्रीतमजी आधीच आमच्या कुटुंबाचा एक भाग आहेत,” असं आमिरने नमूद केलं. मुलीच्या लग्नात भावुक होणार का? असं विचारल्यावर आमिर म्हणाला, “मी तर खूप भावुक होतो. लग्नाच्या दिवशी मी खूप रडणार आहे. त्यादिवशी आमिरची काळजी घ्या अशी चर्चा घरात सुरू झाली आहे, कारण मी माझं हसणं किंवा रडणं नियंत्रित करू शकत नाही.”

View this post on Instagram

A post shared by Ira Khan (@khan.ira)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, आमिरने सध्या कामातून ब्रेक घेतला आहे. तो कुटुंबाबरोबर वेळ घालवत आहे. तो अनेकदा त्याच्या मुलांबरोबर एकत्र दिसतो. कुटुंबाबरोबर वेळ घालवल्यानंतर नाती सुधारल्याचं आमिर सांगतो. “माझ्या कुटुंबाबरोबरचे माझे नाते दिवसेंदिवस सुधारत आहे आणि मी त्याचा आनंद घेत आहे. मी माझ्या मुलांबरोबर वेळ घालवून आनंदी आहे,” असं आमिरने सांगितलं.