बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अभिनेता आमिर खान आणि त्याची पहिली पत्नी रीना दत्ता दोघांचाही बऱ्याच वर्षांपूर्वी घटस्फोट झाला. पण दोघेही एकमेकांना भेटत असतात. बुधवारी आमिर आणि रीना मुंबईतील एका दुकानातून एकत्र बाहेर पडताना दिसले. इतकंच नाही तर त्यांनी फोटो काढणाऱ्या फोटोग्राफर्सना आनंदाने पोजही दिल्या.
…आणि रेखा यांनी सर्वांसमोर चाहत्याला मारली चापट; नेमकं काय घडलं? पाहा Video
आमिरने निळ्या रंगाचा कुर्ता आणि जीन्स तर रीनाने जांभळ्या रंगाचा कुर्ता आणि पांढरी पँट घातली होती. दोघांनी हसत फोटो दिले आणि त्यानंतर ते एकाच कारने निघून गेले. दरम्यान, आमिर व रीना यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. त्यावर नेटकरी विविध प्रतिक्रियाही देत आहेत. काहींनी दोघेही एकत्र छान दिसतात असं म्हटलं आहे. तर, काहींनी आमिरच्या पूर्वाश्रमीच्या दोन्ही पत्नींची हेअरस्टाइल सारखीच असल्याचं म्हटलं आहे.
दरम्यान, गेल्या महिन्यात आमिर त्याच्या दोन्ही पूर्वाश्रमीच्या पत्नी रीना व किरण राव यांच्यासह चित्रपट निर्माते मन्सूर खान यांच्या वन: द स्टोरी ऑफ अल्टिमेट मिथ या पुस्तकाच्या लाँचिंगला उपस्थित होता. यावेळी त्यांचा मोठा मुलगा जुनैदही उपस्थित होता.
आमिर आणि रीना यांचे १९८६ मध्ये लग्न झाले होते. त्यांना एक मुलगा जुनैद आणि एक मुलगी इरा आहे. या जोडप्याचा २००२ मध्ये घटस्फोट झाला. नंतर आमिर किरण रावला भेटला आणि दोघांनी २००६ मध्ये लग्न केले आणि त्यांना एक मुलगा आझाद राव खान आहे. पण या दोघांनीही १६ वर्षांनी २०२१ मध्ये विभक्त होत असल्याची घोषणा केली. आता आमिर व किरण दोघेही त्यांचा मुलगा आझादला एकत्र सांभाळतात.