आमिर खान ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटातून चार वर्षांनी मोठ्या पडद्यावर परतला. त्याने चित्रपटाचे जोरदार प्रमोशन देखील केले, परंतु बहिष्कारामुळे हा चित्रपट थिएटरमध्ये चांगली कामगिरी करू शकला नाही. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यावर प्रेक्षकांनी चित्रपटगृहाकडे पाठ फिरवली. सलग सुपरहीट चित्रपट देणाऱ्या आमिर खानच्या या चित्रपटाने पहिल्या वीकेंडला ५० कोटींचा गल्लाही जमवता आला नाही.

यामागे बऱ्याच गोष्टी कारणीभूत आहेत, त्यापैकी सर्वात महत्त्वाची गोष्ट होती ती म्हणजे ‘बॉयकॉट’ ट्रेंड. आमिर खानच्या या चित्रपटाला बॉयकॉट ट्रेंडचा जबरदस्त फटका बसला. या चित्रपटाच्या अपयशानंतर लगेच आमिर खानने एका खासगी कार्यक्रमात अभिनयातून काही काळ ब्रेक घेत असल्याचे जाहीर केले होते. यानंतर आमिर खान कॅमेरासमोर फारसा आलाच नाही. आता मीडिया रीपोर्टनुसार आमिर खान या सगळ्यापासून दूर नेपाळमध्ये असल्याचं सांगितलं जात आहे.

आणखी वाचा : “या नेत्यांना…” महाराष्ट्रात ‘द केरला स्टोरी’ मोफत दाखवणाऱ्यांबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले

‘आज तक’च्या वृत्तानुसार रविवारी सकाळीच आमिरने नेपाळ गाठलं अन् तिथल्या एका विपश्यना केंद्रात सध्या आमिर खान रहात आहे. नेपाळमध्ये आमिर खान १० दिवसांच्या मेडीटेशन प्रोग्राममध्ये सहभागी होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. आमिर खान तिथे त्याच्या मित्रपरिवारसह आहे की एकटाच या गोष्टीची अजून पुष्टी झालेली नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२०१८ साली प्रदर्शित झालेल्या ‘ठग्स ऑफ हिन्दोस्तान’पासूनच आमिर खानचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप व्हायला सुरुवात झाली होती. ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटाला झालेला विरोध आणि एकूणच बसलेला फटका पाहता सध्या या संगळ्यातून शांतता मिळावी यासाठी आमिरने नेपाळच्या या मेडीटेशन प्रोग्राममध्ये भाग घ्यायचं ठरवलं असल्याचं सांगितलं जात आहे. अभिनयातून ब्रेक घेतला असला तरी आमिर निर्माता म्हणून सक्रिय आहे, आगामी ‘चॅम्पियन’ या चित्रपटाची निर्मिती आमिरच करणार आहे.