बॉलिवूड अभिनेता आमिर खान गेले काही दिवस चर्चेत नव्हता. चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर आमिरने काही वेळ ब्रेकसुद्धा घेतला होता, पण आता आमिर पुन्हा चर्चेत आला आहे. यावेळी कारण थोडं गंभीर आणि खासगी आहे. आमिरच्या आईला म्हणजेच जीनत हुसेन यांना हॉस्पिटलमध्ये भरती केलं असल्याचं वृत्त समोर येत आहे.

दिवाळीच्या दिवसात आमीरच्या आईला हृदयविकाराचा तीव्र अटॅक आल्याने त्यांना मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. परदेशातून आल्यावर आमिर त्याच्या कुटुंबीयांसमवेत त्याच्या पंचगणी येथील घरी एकत्र रहात होता. तेव्हाच त्याच्या आईला हा अटॅक आल्याचं समोर आलं आहे.

आणखी वाचा : ‘स्त्री २’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार; ‘भेडिया’ आणि ‘रूही’ यांचीदेखील होणार एंट्री?

‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तानुसार आमिरची आई जीनत यांची तब्येत ठीक आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार त्या उपचारांना योग्य प्रतिसाद देत आहेत. त्यामुळे आता त्या अगदी व्यवस्थित असल्याचं स्पष्ट झालं आहे. हॉस्पिटलबाहेर येऊन आमिर आणि त्याच्या परिवारातील सदस्यांनी लोकांना अफवा पसरवू नये यासाठी विनंती केली आहे. नुकतंच करण जोहरच्या कार्यक्रमात आमिरने त्याला आता त्याच्या मुलं आणि आईबरोबर वेळ घालवायची इच्छा व्यक्त केली होती.

View this post on Instagram

A post shared by Ira Khan (@khan.ira)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आमिर खानच्या यावर्षी आलेल्या ‘लाल सिंह चड्ढा’ या चित्रपटाची अवस्था फार बिकट झाली. आमिरच्या भूतकाळातील काही स्टेटमेंटमुळे आणि इतर काही गोष्टींमुळे प्रेक्षकांनी या चित्रपटाला पूर्णपणे बॉयकॉट केलं. आमिरच्या कारकीर्दीतील हा सर्वात मोठा फ्लॉप चित्रपट मानला जातो.