अभिनेता आमिर खानची मुलगी आयरा खानचं लग्न झालं आहे. तिने नुपूर शिखरेशी लग्नगाठ बांधली. मागचा एक आठवडा नुपूर व आयराच्या लग्नाचीच चर्चा आहे. त्यांनी आधी ३ जानेवारी रोजी नोंदणी पद्धतीने लग्न केलं, त्यानंतर १० जानेवारी रोजी उदयपूरमध्ये लग्न केलं. या लग्नातील फोटो व व्हिडीओची चर्चा आहे, अशातच लाडक्या लेकीच्या लग्नाबद्दल आमिर खानने प्रतिक्रिया दिली आहे.
आपल्या भावना सनईसारख्या होत्या असं आमिरने म्हटलंय. ‘स्पाइस सोशलने’ शेअर केलेल्या एका व्हिडीओमध्ये आमिर खान म्हणाला, “माझी भावना सनईसारखी होती. हे एक वाद्य आहे जे लग्नांमध्ये वाजवले जाते. सनईमध्ये एक गुण आहे की ती तुम्हाला थोडा आनंद देते आणि थोडेसे दुःखही देते. हे भावनांचे मिश्रण आहे. तर, हीच माझीही भावना आहे.”
मागच्या अनेक दिवसांपासून नुपूर शिखरे व आयरा खानच्या लग्नाची चर्चा होती. अखेर दोघे लग्नबंधनात अडकले आहेत. मुंबईत नोंदणी पद्धतीने लग्न केल्यावर उदयपूरमध्ये त्यांनी लग्न केलं. त्यानंतर आता त्यांच्या लग्नाच्या रिसेप्शनची जय्यत तयारी सुरू आहे. या रिसेप्शन सोहळ्याला २५०० हून अधिक पाहुण्यांना निमंत्रण असेल अशी माहिती समोर येत आहे.
Video: आयरा खान व नुपूर शिखरे उदयपूरमध्ये अडकले लग्नबंधनात, पहिला व्हिडीओ आला समोर
दरम्यान, आयराच्या लग्नात खान कुटुंब एकत्र आल्याचं पाहायला मिळालं. आमिर व त्याच्या दोन्ही पत्नी रीना दत्ता व किरण राव या लग्नाला उपस्थित होत्या. त्यांची दोन्ही मुलं जुनैद व आझाद देखील होते. या लग्नात आमिर व रीना यांनी वधूचा पालकांची जबाबदारी पार पाडली. तर किरण व आझाद यांनीही आयराच्या लग्नात गाणी गायली होती. एकंदरीतच खूप आनंदात हा विवाहसोहळा पार पडला.