बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आम आदमी पार्टीचे नेता तसेच पंजाब राज्यसभेचे खासदार राघव चड्ढा या दोघांच्या रिलेशनशिपच्या चांगल्याच चर्चा होत आहेत. मुंबईत एका रेस्टोरंटबाहेर हे दोघे एकत्र दिसल्याने याबद्दलच्या चर्चांना उधाण आलंय, अशातच या चर्चांवर राघव चड्ढा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. परिणीती चोप्रा आणि खासदार राघव चड्ढा खरंच एकमेकांना डेट करत आहेत? समोर आलं सत्य परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा या दोघांनी याबद्दल कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार या हे दोघेही चांगले मित्र आहेत, तर चाहते मात्र त्यांच्या अफेअरबदद्ल बोलत होते. अशातच राघव चड्ढा यांना त्यांच्या परिणीतीबरोबरच्या भेटीबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर “मला तुम्ही राजकारणाबद्दल प्रश्न विचारा, परिणीतीबद्दल प्रश्न विचारू नका," असं राघव म्हणाले. “माझ्या पतीला शोधा”, २२ दिवसांपासून बेपत्ता नवऱ्यासाठी अभिनेते शेखर सुमन यांच्या बहिणीचा आक्रोश दोघांच्या अफेअरबद्दल चर्चा होत आहेत, असा प्रश्न पुन्हा एकदा राघव यांना विचारण्यात आला. त्यावर वेळ आल्यावर उत्तर देऊ असं राघव म्हणाले. त्यामुळे या दोघांची नक्की मैत्री आहे की त्यापलीकडे काही आहे, याबद्दल राघव यांनी बोलणं टाळलं. अद्याप परिणीतीनेही याबद्दल कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.