बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचा मेहुणा आणि अभिनेता आयुष शर्मा गेल्या वर्षभरापासून त्याच्या ‘रुस्लान’ या ॲक्शन चित्रपटामुळे खूप चर्चेत होता. सलमानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटाबरोबरच ‘रूस्लान’ची झलक सादर करण्यात आली होती. आता नुकताच या चित्रपटाचा प्री-टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे ज्यात आयुष शर्मा जबरदस्त अॅक्शन अवतारात दिसत आहे. याआधी या चित्रपटातील आयुषचा लूक समोर आला होता.

दीड मिनिटांच्या या टीझरमध्ये आयुष जीवघेणे स्टंट आणि धासु अॅक्शन करताना पाहायला मिळत आहे. याबरोबरच त्याच्या पिळदार शरीरयष्टीचंही प्रचंड कौतुक होताना दिसत आहे. “हारायला काही नाही, पण जिंकण्यासाठी सर्वकाही आहे.” हा एकच डायलॉग या संपूर्ण टीझरमध्ये आपल्या कानावर पडतो. बाकी संपूर्ण टीझरमध्ये जोरदार अॅक्शनच पहायला मिळत आहे.

आणखी वाचा : विमानतळावर शेफाली जरीवालाचं पतीबरोबरचं ‘ते’ कृत्य पाहून नेटकरी भडकले; म्हणाले, “यांना गादी आणि…”

एकूणच हा एक जबरदस्त अॅक्शन थ्रिलरपट असणार आहे हे याच्या ट्रेलरवरुन स्पष्ट होत आहे. मध्यंतरी या चित्रपटाच्या शीर्षकावरुन वाद सुरू होता. ‘रुस्लान’चे निर्माते केके राधामोहन आणि आयुष शर्मा यांना अभिनेता राजवीर शर्माचे वकील रुद्र विक्रम सिंह यांनी कायदेशीर नोटीसही पाठवली होती. २००९ साली याच शीर्षकासह एक चित्रपट प्रदर्शित झाल्याचा दावा त्यांनी केला आहे. अभिनेता राजवीर शर्मा आणि ज्येष्ठ अभिनेत्री मौसमी चॅटर्जी यांची मुलगी मेघा चॅटर्जी हे या चित्रपटात मुख्य भूमिकेत होते. जर आयुषने ‘रुस्लान’ हा शब्द वापरला असेल तर तो कथा आणि संवादातून काढून टाकण्यात यावा अशी मागणीही करण्यात आली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आता चित्रपटाचा टीझरही कोणताही बदल न करता प्रदर्शित झाल्याने हा वाद मिटला असं गृहीट धरलं जात आहे. या चित्रपटात आयुष शर्मा व्यतिरिक्त प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता जगपती बाबू अन् अभिनेत्री सुश्री मित्रादेखील दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन कात्यायन शिवपुरी यांनी केले आहे. हा चित्रपट २६ एप्रिल २०२४ रोजी मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. यापूर्वी, आयुषनं सलमान खानबरोब ‘अंतिम: द फायनल ट्रुथ’ या चित्रपटात काम केलं होतं.