Biggest Flop Actor of Bollywood : आई किंवा वडील इंडस्ट्रीत सुपरस्टार आहे, म्हणून त्यांच्या मुलांनाही या क्षेत्रात आल्यावर यश मिळेलच असं नाही. आज आम्ही तुम्हाला बॉलीवूडमधील अशाच एका अभिनेत्याबद्दल सांगणार आहोत. ज्याचे आई व वडील दोघांनीही फिल्म इंडस्ट्री गाजवली. त्याचे वडील तर ८२ व्या वर्षीही ब्लॉकबस्टर चित्रपट देत आहेत.
या अभिनेत्याला इंडस्ट्रीत २५ वर्षे झाली आहेत. स्टारकिड असूनही त्याने हिटपेक्षा फ्लॉप सिनेमे जास्त दिले आहेत. अलीकडच्या काळात त्याने गंभीर भूमिका साकारल्या, त्यामुळे त्याच्या अभिनयाचं कौतुक होत आहे. त्याचे वडील त्याचं सातत्याने कौतुक करत असतात, पण याला हवं तितकं यश मिळालं नाही.
हा अभिनेता दुसरा कोणी नसून अमिताभ व जया बच्चन यांचा मुलगा अभिषेक बच्चन आहे. अभिषेकने २००० साली ‘रिफ्यूजी’ सिनेमातून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. पण त्याचा हा पहिलाच चित्रपट फ्लॉप झाला होता. यामुळे निर्मात्यांचं कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालं होतं. यानंतर अभिषेकने बरेच चित्रपट केले, त्यातले काही हिट झाले तर बहुतांशी चित्रपट फ्लॉप झाले.
अभिषेक महिन्याला कमावतो कोट्यवधी रुपये
आजवर अभिषेक बच्चनचे अनेक चित्रपट फ्लॉप झाले असले तरी तो महिन्याला लाखो रुपये कमावतो. झी न्यूजच्या वृत्तानुसार, ४९ वर्षीय अभिषेक बच्चनची महिन्याची कमाई जवळपास १८ लाख रुपये आहे, जी येत्या काळात आणखी वाढणार आहे. पण महत्त्वाचं म्हणजे ही कमाई तो चित्रपटांमधून करत नाही.
एसबीआयकडून अभिषेक बच्चनला मिळतं भाडं
अभिषेक बच्चन व अमिताभ बच्चन यांनी आपल्या जुहू येथील बंगल्याचा ग्राउंड फ्लोअर लीजवर दिला आहे. २८ सप्टेंबर २०२१ पासून त्यांनी हा करार केला आहे. करारानुसार, बँक अभिषेक बच्चनला दर महिन्याला १८.९० लाख रुपये देते. काही वर्षांनी त्याला बँकेकडून २३.६ लाख रुपये भाडं मिळेल. तसेच १० वर्षांनंतर हे भाडं २९.५३ लाख रुपये होईल.
अभिषेक बच्चन दोन संघांचा मालक
अभिषेक बच्चनला खेळाची खूप आवड आहे. तो जयपूर पिंक पँथर्सचा मालक आहे. तसेच फुटबॉल टीम चेन्नईयन एफसीचा सह-मालक आहे. या दोन्ही टीमच्या माध्यमातून अभिषेक बच्चन चांगले पैसे कमावतो.
अभिषेक बच्चनची संपत्ती
अभिषेक बच्चन चित्रपटांमधून मोठी कमाई करतो. त्याने अलीकडेच मुंबईत प्रॉपर्टी खरेदी केली आहे. काही मालमत्ता भाड्याने दिल्या आहेत, त्यातून त्याला पैसे मिळतात. तसेच अभिषेककडे अनेक लक्झरी गाड्या आहेत. अभिषेक बच्चनची एकूण संपत्ती २८० कोटी रुपये आहे.