हिंदी चित्रपटसृष्टीतील दिवंगत अभिनेते व विनोदवीर जगदीप यांनी त्यांच्या पूर्ण करिअरमध्ये बऱ्याच गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केलं. जगदीप यांनी प्रामुख्याने सहाय्यक भूमिका केल्या होत्या. जगदीप यांचं खरं नाव सय्यद इश्तियाक अहमद जाफरी होतं. सहाय्यक भूमिका साकारून लोकप्रियता मिळवणारे जगदीप यांनी खऱ्या आयुष्यात तीन विवाह केले.

जगदीप यांना ३ लग्नापासून सहा अपत्ये झाली. जगदीप जावेद जाफरी व नावेद जाफरी यांचे वडील होय. जावेद व नावेद देखील वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत चित्रपटसृष्टीत आले. त्यांनी त्याच्या अभिनयाने आणि नृत्याने प्रेक्षकांची मनं जिंकली. पण तुम्हाला माहित आहे का की जगदीप यांना एक मुलगी देखील आहे. तिने अनेक चित्रपट, वेब सीरिजमध्ये काम केलं आहे. ती जावेद जाफरीची सावत्र बहीण आहे. जावेद जाफरी व तिच्या वयात ३१ वर्षांचे अंतर आहे.

जगदीप यांचे ३ विवाह आणि अपत्ये

अभिनेते जगदीपने यांनी ३ विवाह केले. त्यांचं पहिले लग्न नसीम बेगमशी झालं होतं, या लग्नापासून त्यांना तीन अपत्ये झाली. पण त्यांच्याबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही. जगदीप यांचं दुसरं लग्न सुगरा बेगमशी झालं होतं. या लग्नापासून त्यांना जावेद जाफरी आणि नावेद जाफरी ही दोन मुलं झाली. जावेद आणि नावेद मागील कित्येक वर्षांपासून फिल्म इंडस्ट्रीत काम करत आहेत. जगदीप यांनी तिसरं लग्न नाझिमा नावाच्या महिलेशी केलं होतं. या लग्नापासून त्यांना मुलगी झाली. त्या मुलीचं नाव मुस्कान जाफरी. मुस्कानचा जन्म १९९४ मध्ये झाला. मुस्कान सध्या ३१ वर्षांची आहे. जावेद जाफरीचा मुलगा मीजान त्याच्या सावत्र आत्यापेक्षा फक्त एक वर्षाने लहान आहे.

३१ वर्षांनी लहान आहे सावत्र बहीण

जावेद जाफरीच्या सावत्र बहिणीचं नाव मुस्कान जाफरी आहे. मुस्कान अभिनेत्री आहे. तसेच ती एक व्हॉइस-ओव्हर आर्टिस्ट देखील आहे. तिने तिच्या अभिनय करिअरची सुरुवात लघुपटांपासून केली. त्यानंतर, तिने ‘द गुड कर्मा हॉस्पिटल’, ‘मिसमॅच्ड’, ‘द फेम गेम’, ‘नोबलमेन’ आणि ‘सुपरबॉईज ऑफ मालेगाव’ सारख्या वेब सीरिज आणि चित्रपटांमध्ये दिसली. ‘द फेम गेम’ मध्ये तिने माधुरी दीक्षित आणि संजय कपूरच्या मुलीची भूमिका केली होती. ‘कॉल मी बे’ या प्राइम व्हिडीओवरील वेब सीरिजमध्ये तिने अनन्या पांडेबरोबर काम केलं होतं. यात मुस्कान जाफरीने अनन्या पांडेच्या मैत्रिणीची भूमिका केली होती.

जावेद जाफरी व मुस्कान जाफरी सावत्र भावंडे आहेत. पण आजपर्यंत कधीच ते दोघे एकत्र दिसले नाहीत.