बॉलिवूड स्टार्स आणि त्यांची मुलं देखील सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतात. जवळपास सगळेच स्टार किड्स आपल्या आई- वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत बॉलिवूडमध्ये पदार्पण करताना दिसतात. पण अभिनेता आर माधवनच्याबाबतीत मात्र असं अजिबात घडलेलं नाही. दाक्षिणात्य आणि हिंदी चित्रपटसृष्टीत सुपरहिट चित्रपट देणाऱ्या आर माधवनचा मुलगा वेदांतनं मात्र अभिनय नाही तर स्विमिंगमध्ये आपलं करिअर करण्याचं ठरवलं आहे.

या क्षेत्रात तो आपल्या वडिलांचं आणि आपल्या देशाचं नाव देखील उज्ज्वल करताना दिसत आहे. नुकतंच आर माधवनने त्याचा मुलगा वेदांतच्या चित्रपटसृष्टीत येण्याबद्दल वक्तव्य केलं आहे. भविष्यात माधवनचा मुलगा जर या क्षेत्रात येऊ पहात असेल तर यावर माधवनची प्रतिक्रिया काय असेल याबद्दलही त्यांनी खुलासा केला आहे.

आणखी वाचा : ‘शोले’च्या ‘सांभा’ला व्हायचं होतं क्रिकेटर; ‘या’ कारणासाठी मॅक मोहन यांनी गाठली होती मुंबई

एका मीडिया पोर्टलला दिलेल्या मुलाखतीमध्ये माधवन म्हणाला, “मी या चित्रपटसृष्टीच्या प्रेमात आकंठ बुडालो आहे. यासारखा दूसरा व्यवसाय नाही. माझ्या मुलाला जेव्हा केव्हा या क्षेत्रात यावंसं वाटेल तेव्हा मी त्याला अडवणार नाही, फक्त हे क्षेत्र फारच आव्हानांनी भरलेलं आहे याची त्याला जाणीव हवी. मी आजवर त्याला कोणतीही गोष्ट करण्यापासून अडवलेलं नाही. त्याला चित्रपटसृष्टीत यायचं असेल तर तो त्याचा निर्णय असावा, मी नक्कीच त्याला मदत करेन.”

View this post on Instagram

A post shared by R. Madhavan (@actormaddy)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुढे आपल्या मुलाच्या स्विमिंगमधील कर्तृत्वाबद्दल माधवन म्हणाला, “वेदांत सध्या त्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी झटतोय हे पाहून मला आनंद होतो. त्याला आणखी बराच पल्ला गाठायचा आहे. ऑलिंपिकसाठी त्याला प्रचंड मेहनत घ्यायची आहे. सध्या त्याला मिळणारी ही प्रसिद्धी ही त्याच्या करिअरसाठी योग्य नसल्याने आम्ही जाणून बुजून त्याला या प्रसिद्धीपासून लांब ठेवत आहोत.” माधवनचा ‘रॉकेट्री द नंबी इफेक्ट’ हा चित्रपट लोकांनी चांगलाच डोक्यावर घेतला, आता पहिली भारतीय मोटर कार बनवणाऱ्या एका महान शास्त्रज्ञाचा बायोपिक माधवन प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे.