बॉलीवूडचे कलाकार सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. कधी त्यांच्या चित्रपटातील भूमिकेमुळे, कधी त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे तर कधी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे हे कलाकार चर्चांचा भाग बनतात. आता अभिनेता समिर सोनीने आपल्या खासगी आयुष्याबद्दल खुलासा केला आहे.
काय म्हणाला अभिनेता?
उज्जवल त्रिवेदी यांच्या युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत आपल्या खासगी आयुष्याबद्दल खुलासा केला आहे. त्याने अभिनेत्री आणि त्याची पत्नी नीलमबरोबरचे नाते कसे जुळले यावर बोलताना म्हटले आहे की, “जेव्हा नीलमने त्याला पहिल्यांदा पाहिले, तेव्हा ती तिची मैत्रीण आणि निर्माती एकता कपूरबरोबर होती. त्यावेळी मी गोड दिसतो, चांगला दिसतो, हे तिने तिच्या मैत्रीणीला सांगितले, तिने आणखी कोणालातरी सांगितले आणि माझ्यापर्यंत ती गोष्ट पोहचली. नीलम ८०-९०च्या दशकात आघाडीची अभिनेत्री होती. अशा अभिनेत्रीकडून माझे कौतुक होणे, माझ्यासाठी आनंदाची गोष्ट होती. त्यामुळे माझा स्वत:वरचा विश्वास वाढला. त्यानंतर मला एका ज्योतिषाने सांगितले की, न अद्याक्षरावरुन नाव असणारी मुलगी माझ्या आयुष्यात येईल. ती मुलगी दागिन्यांसाठी काम करत असेल. मला माहीत नाही, नीलमने त्या ज्योतिषाला पैसे दिले होते की काय पण ज्यातिषाने मला तसे सांगितल्यावर माझ्या मनात लगेच नीलमचा विचार आला. पण त्यावेळी वाटले हा निव्वळ योगायोग आहे. त्यानंतर मी वर्तमानपत्रात येणाऱ्या फोटोंकडे लक्ष द्यायला सुरूवात केली.
हेही वाचा: Bigg Boss Marathi Live : उरले फक्त काही तास… ‘बिग बॉस’च्या घरात यंदा कोण प्रवेश करणार?
पुढे बोलताना अभिनेत्याने म्हटले आहे की, त्यानंतर दीड वर्षानंतर एका दिवाळी पार्टीत आमची भेट झाली. एकताने आमची ओळख करून दिली, मी तिला म्हटले की तू खूप गोड दिसतेस. तिथून निघताना माझ्याकडे तिचा नंबर नव्हता पण, मी तिला म्हणालो की मी तुला फोन करेन. यानंतर आणखी एक वर्ष निघून गेले. असे दोन-तीन वेळा घडले. आम्ही एकमेकांना पाहिले होते, त्यानंतर मी नीलमला तीन वर्षानंतर पहिल्यांदा कॉल केला. त्यावेळी रात्रीचे तीन वाजले होते, तीने फोन उचलला नाही. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी मेसेज केला, तू परत कॉल करण्यावर विश्वास ठेवत नाहीस का? त्यावर तीने उत्तर दिले, मला कसे माहित असेल, तो व्यक्ती तूच आहेस.
समीर पुढे म्हणतो, आमचा एकमेकांबद्दलचा विचार स्पष्ट होता. आम्हाला सुरूवातीपासूनच माहीत होते, जर आम्ही एकत्र असू तर, आम्ही लग्न करू आणि तसेच झाले. दरम्यान, या जोडप्याने २०११ मध्ये लग्नगाठ बांधली असून त्यांना अहाना नावाची मुलगी आहे.