‘किंग खान’, ‘बाजीगर’, ‘किंग ऑफ रोमॅन्स’ अशा विविध नावाने ओळखला जाणारा अभिनेता म्हणून शाहरुख खानला ओळखले जाते. शाहरुख खान हा सध्या त्याच्या ‘पठाण’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर नवनवे विक्रम रचताना दिसत आहे. पठाण या चित्रपटाने जगभरात १००० कोटी रुपये कमावले आहे. नुकतंच शाहरुखने त्याच्या निवृत्तीबद्दल भाष्य केले आहे.

शाहरुख खान व दीपिका पदुकोणचा ‘पठाण’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर सध्या बक्कळ कमाई करत आहे. चार वर्षांनंतर शाहरुखने रुपेरी पडद्यावर कमबॅक केलं. या चित्रपटाने जगभरात १००० कोटींचा टप्पा ओलांडत इतिहास रचला. गेल्या आठवड्यात या चित्रपटाने भारतात ५०० कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश केला होता. अंदाजानुसार ‘पठाण’ने रविवारी बॉक्स ऑफिसवर ४.३० ते ४.५० कोटी रुपयांची कमाई केली.
आणखी वाचा : ‘पठाण’ची जादू कायम! जगभरात कमावले १००० कोटी; तर, भारतात चित्रपटाच्या कमाईचा आकडा तब्बल ‘इतके’ कोटी

या चित्रपटाला मिळालेल्या भरघोस यशानंतर त्याने ‘आस्क SRK’ सेशन घेतले. त्यावेळी त्याने विविध गोष्टींबद्दल खुलासा केला. यावेळी त्याला एक चाहत्याने “तुम्ही निवृत्ती घेतल्यानंतर सिनेसृष्टीतील सर्वात मोठी गोष्ट कोणती?” असा प्रश्न विचारला.

“मी अभिनयातून कधीच निवृत्त होणार नाही. एकतर मला काढून टाकावे लागेल…असं झाल्यासही कदाचित मी अजून हॉट होऊन सिनेसृष्टीत परतेन”, असे शाहरुख खान म्हणाला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान ‘पठाण’ हिंदीसह तमिळ, तेलुगू भाषेमध्येही प्रदर्शित करण्यात आला. आतापर्यंत या चित्रपटाने जगभरात १००० कोटींची कमाई केली आहे. पठाण हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक ओपनिंग करणारा ठरला आहे. या चित्रपटाने ‘केजीएफ’ आणि ‘बाहुबली’, ‘वॉर’सारख्या चित्रपटांनाही मागे टाकलं आहे.