‘किंग खान’, ‘बाजीगर’, ‘किंग ऑफ रोमॅन्स’ अशा विविध नावाने ओळखला जाणारा अभिनेता म्हणून शाहरुख खानला ओळखले जाते. शाहरुख खान नेहमीच त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे आणि त्याच्या लाईफस्टाईलमुळे चर्चेत असतो. त्याचे महागडे कपडे, किंमती गाड्या पाहून सगळेच अवाक् होतात. शाहरुख खान राहत असलेल्या वांद्र्यातील ‘मन्नत’ या बंगल्याविषयी अनेकांना कुतूहल आहे. नुकतंच शाहरुख खानने मन्नत बंगल्याच्या वीज बिलाबद्दल खुलासा केला आहे.

शाहरुख खान बॉलिवूडमधील सगळ्यात श्रीमंत अभिनेत्यांपैकी एक आहे. आज तो कोट्यवधी संपत्तीचा मालक आहे. वांद्रे येथे असलेल्या मन्नत या त्याच्या आलिशान बंगल्यामध्ये तो राहतो. शाहरुख खानप्रमाणेच त्याच्या या बंगल्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. नुकतंच शाहरुखने Ask SRK सेशनमध्ये याबद्दल भाष्य केले.
आणखी वाचा : फॅन्सचा फेव्हरेट स्पॉट असलेल्या ‘मन्नत’ नेम प्लेटसमोर गौरी खानने काढला फोटो; डायमंड नेम प्लेटमागील खरं कारणही सांगितलं

शाहरुखने ट्विटरवर नुकताच त्याच्या चाहत्यांशी संवाद साधला. त्यासाठी त्याने Ask SRK हे प्रश्न-उत्तरांचं एक सेशन ठेवलं होतं. या सेशनच्या माध्यमातून शाहरुखला त्याच्या चाहत्यांनी अनेक प्रश्न विचारले. शाहरुखनेही अनेक प्रश्नांना उत्तरं दिली. यावेळी एका चाहत्याने चक्क शाहरुखला तुमच्या घराचं दर महिन्याचं वीजबिल किती येतं, असा प्रश्न विचारला.

आणखी वाचा : …म्हणून शाहरुख खान ‘मन्नत’बाहेर आलेल्या चाहत्यांना भेट देण्यास करतो टाळाटाळ

त्यावर शाहरुख म्हणाला, “आमच्या संपूर्ण घरात प्रेमाचा प्रकाश आहे. त्यामुळे सर्व घर उजळलं आहे. यामुळे वीजबिलच येत नाही”. दरम्यान शाहरुखचा हा मन्नत बंगला २७ हजार स्क्वेअर फुटचा आहे. २००१ पासून शाहरुख त्याच्या कुटुंबीयांबरोबर याच ठिकाणी वास्तव्यास आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शाहरुखने हा बंगला विकत घेतल्यानंतर त्याची पत्नी गौरी खान हिने एका आर्किटेक्टबरोबर मिळून त्याचा इंटिरियर डिझाईनिंग केलं. या बंगल्याला सहा मजले, अनेक खोल्या, एक अवॉर्ड रूम, एक छोटसं मूव्ही थिएटर, जिम आणि स्विमिंग पूलही आहे.