अभिनेत्री तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा यांच्या अफेअरच्या चर्चा अनेक दिवसांपासून बी-टाऊनमध्ये होत्या. दोघांनाही बऱ्याचदा एकत्र बघण्यात आलं होतं. अखेर तमन्नाने विजयबरोबरच्या नात्याबाबत मौन सोडत प्रेमाची कबुली दिली. विजयनेही तमन्नाबरोबर आनंदी असल्याचं सांगितलं होतं.

हेही वाचा- Video : कार्तिक आर्यनने भर कार्यक्रमात उचलली कियारा अडवाणीची सँडल; व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले…

विजय आणि तमन्ना आता उघडपणे त्यांच्या नात्याबद्दल बोलताना दिसत आहेत. अलीकडेच टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत, विजयने तमन्नाच्या कोणत्या सवयीचा त्याला सर्वात जास्त राग येतो याबाबत खुलासा केला आहे. विजय म्हणाला, “तिला वर्कआउटचे थोडे वेड आहे. याचा अर्थ, ती वर्कआउट्सनुसार तिच्या दिवसाचे नियोजन करते. जिममध्ये गेल्याने तिची झोपही पूर्ण होत नाही, मी तिला सांगतो की चांगल्या जीवनशैलीसाठी तुमची झोप पूर्ण करणे खूप आवश्यक आहे, परंतु ती फक्त ४ तास झोपते आणि नंतर जिममध्ये जाते.

हेही वाचा- …जेव्हा ईशा देओल सावत्र आई प्रकाश कौर यांना पहिल्यांदा भेटली होती; सनी देओलला फोन करत म्हणालेली…

विजय वर्माच्या या खुलाशानंतर तमन्नाने तिच्या स्पष्टीकरणात सांगितले की ती खूप खाते, त्यामुळे ती वर्कआउट चुकवू शकत नाही. यानंतर जेव्हा तमन्नाला विचारण्यात आले की ती कोणती सवय आहे जी तिला विजयबद्दल अजिबात आवडत नाही, तेव्हा ती म्हणाली की मला विजयबाबत काही सांगायचे नाही, परंतु मी विजयला सतवण्यासाठी नवनवीन कल्पना शोधून काढते. पण सत्य हे आहे की मला त्याला त्रास द्यायचा असतो. त्यासाठी मी काही कल्पनांचा विचार करत राहते. पण तो खूप शांत आहे. त्यांच्या चित्रपटातील भूमिकांकडे जाऊ नका, तो शांततेची मूर्ती आहे.”

हेही वाचा- Video: श्वेता तिवारीची लेक होणार सैफ अली खानची सून? इब्राहिम-पलकचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तमन्नाच्या वर्कफ्रण्टबद्दल बोलायचं झालं तर तिचा ‘जी करदा’ चित्रपट १५ जूनला ॲमेझॉन प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित झाला आहे. अनुरिमा शर्मा दिग्दर्शित, या चित्रपटात सुहेल नय्यर, सायन बॅनर्जी, आशिम गुलाटी, हुसैन दलाल आणि अन्या सिंग यांच्याही भूमिका आहेत.