बॉलीवूड अभिनेता विक्रांत मेस्सी त्याच्या अभिनयासाठी ओळखला जातो. आपल्या करिअरमध्ये त्याने अनेक चित्रपट आणि वेब सिरीजमध्ये काम केले आहे. पण तो ‘मिर्झापूर’ या वेब सीरिजसाठी खास ओळखला जातो. यामध्ये त्याने बबलू पंडितची भूमिका साकारून नाव आणि प्रसिद्धी दोन्ही मिळवले. सध्या तो कोणत्याही चित्रपट किंवा वेब सीरिजमुळे नाही तर त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. विक्रांत लवकरच बाबा होणार आहे.

नाना पाटेकरांचं खरं नाव माहितीये का? रायगडमध्ये जन्मलेल्या नानांची कौटुंबीक व शैक्षणिक पार्श्वभूमी वाचून थक्क व्हाल

गणेश चतुर्थीच्या दिवशी विक्रांत आणि त्याची पत्नी शीतल ठाकूर यांच्याबद्दल ही आनंदाची बातमी समोर आली आहे. लवकरच दोघेही पालक होणार असून त्यांच्या घरी चिमुकल्या बाळाचे आगमन होणार आहे. ‘ई-टाइम्स’ने याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिलं आहे. मात्र, यावर विक्रांत आणि शीतल यांची कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही किंवा त्यांनी याबाबत कोणताही खुलासा केलेला नाही.

पालकांच्या विरोधात जाऊन १८ व्या वर्षी लग्न अन् वर्षभरात घटस्फोट; सुनिधी म्हणाली, “माझ्याकडून चुका झाल्या, पण…”

विक्रांत आणि शीतल यांच्या लव्ह लाईफबद्दल बोलायचं झाल्यास ते दोघेही एकमेकांना २०१५ पासून ओळखत होते. तेव्हापासून दोघेही एकमेकांना डेट करत होते. सुमारे ४ वर्षे डेटिंग केल्यानंतर या जोडप्याने २०१९ मध्ये साखरपुडा केला होता. यानंतर त्यांनी २०२२ मध्ये म्हणजेच गेल्या वर्षी १४ फेब्रुवारी रोजी एका खासगी समारंभात लग्न केले.

View this post on Instagram

A post shared by Sheetal Massey (@sheetalthakur)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विक्रांत व शीतल यांच्या लग्नाच्या वर्षभरानंतर ते पालक होणार असल्याची गोड बातमी समोर आली आहे. पण त्या दोघांकडून याबाबत अधिकृत माहिती आलेली नाही. दरम्यान, विक्रांतच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास तो शेवटचा ‘मेड इन हेवन’, ‘गॅसलाइट’ आणि ‘मुंबईकर’मध्ये दिसला होता. लवकरच त्याचे ‘यार जिगरी’, ‘सेक्टर ३६’, ‘१२वी फेल’ आणि ‘फिर आयी हसीन दिलरुबा’ हे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.