बॉलिवूड कलाकार आणि त्यांचं मानधन हा नेहमीच चर्चेतचा विषय ठरतो. अभिनेत्रींना अभिनेत्यांच्या मानाने कमी मानधन दिलं जातं असं आतापर्यंत अनेक अभिनेत्रींनी संगितलं आहे. कलाकार भली मोठी रक्कम मानधन म्हणून आकारतात त्यामुळे निर्मात्यांनाही याचा फटका बसतो अशी तक्रार आतापर्यंत अनेकांनी केली आहे. आता विक्रांत मेस्सी मानधनाच्या बाबतीत केल्या जाणाऱ्या फरकाबाबत एक वेगळीच खंत व्यक्त केली आहे.

विक्रांत मेस्सी याने विविध मध्यमांतून कामं करत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. आज त्याचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. अनेक चित्रपटांमध्ये त्याने प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. अनेक वर्ष मेहनत घेऊनही त्याला दीपिका पदुकोण इतकं मानधन त्याला कधीच मिळालं नाही, असं त्याने नुकतंच एका मुलाखतीत सांगितलं आहे.

आणखी वाचा : भर कार्यक्रमात दीपिका पदुकोणला झाले अश्रू अनावर, म्हणाली, “आज संपूर्ण जग…”

विक्रांत त्याच्या आगामी ‘क्राइम आज कल’ सीरिजच्या प्रमोशनमध्ये सध्या व्यग्र आहे. या सिरिजच्या प्रमोशनदरम्यान ‘इ टाइम्स’ला दिलेल्या एका मुलाखतीत तो म्हणाला, “बाहेरचे तथाकथित ‘ए-लिस्टर्स’ही या प्लॅटफॉर्मवर चित्रपट करत आहेत. हे ‘तथाकथित ए’-लिस्टर्स इथे सुपरस्टार आहेत. माझ्या बहुतेक महिला सहकलाकारांना माझ्यापेक्षा जास्त मानधन दिलं जात आहे. मी याबद्दल कधीच बोललो नाही. पण मी खूप काम केलं. मी आतापर्यंत केलेलं काम पाहता मला इतकं मानधन दिलं गेलं नाही जितकं दीपिका पदुकोणला मिळतं.”

हेही वाचा : “मी आणि दीपिका लवकरच…”, रणवीर सिंगने चाहत्यांना दिले खास सरप्राईज

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आता त्याचं हे बोलणं खूप चर्चेत आलं आहे. या मुलाखतीतून त्याने पुन्हा एकदा बॉलिवूड स्टार्स आकारत असलेल्या मानधनाकडे सर्वांचं लक्ष वेधलं आहे.