दिवंगत ज्येष्ठ अभिनेते विनोद खन्नाचं नाव बॉलीवूडच्या सुपस्टारमध्ये घेतलं जातं. आज जरी ते आपल्यात नसले तरी त्यांच्या भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. ६ ऑक्टोबर १९४६ रोजी पाकिस्तानमध्ये जन्मलेला या अभिनेत्याने आपल्या कारकिर्दीत अनेक सुपरहिट चित्रपट दिले. मात्र, चित्रपटात काम करण्यासाठी विनोद खन्ना यांना त्यांच्या वडिलांचा कडाडून विरोध होता. चित्रपटात काम केलं तर जीव घेईन अशी धमकीही त्यांना त्यांच्या वडिलांनी दिली होती. काय आहे तो किस्सा घ्या जाणून
हेही वाचा- “शिक्षा भोगणं…”, संजय दत्तला आठवले तुरुंगातील दिवस; म्हणाला, “ग्रंथ वाचन, स्वयंपाक अन्…”
विनोद खन्ना हे असे कलाकार होते ज्यांनी केवळ नायकाची भूमिकाच नाही तर खलनायकाची भूमिका साकारूनही खूप प्रसिद्धी मिळवली. सन १९६८ मध्ये सुनील दत्त यांनी त्यांना ‘मन का मीत’ या चित्रपटात खलनायकाची संधी दिली. या चित्रपटानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. विनोद खन्ना यांनी जवळपास १३० चित्रपटांमधून आपल्या अभिनयाची छाप सोडली.
चित्रपटात काम करण्याची इच्छा व्यक्त करताच विनोद खन्ना यांच्या वडिलांनी त्यांच्या डोक्यावर बंदूक ताणली आणि धमकी दिली की, “जर तू चित्रपटात काम केलसं तर मी तुला गोळी मारेन”. पण विनोद खन्नाही आपल्या हट्टावर ठाम होते. अखेर बाप-लेकाच्या भांडणात विनोद खन्ना यांची आईने मध्यस्थी केली आणि गुंता सोडवला.
एक वेळ अशी आली की होती विनोद खन्नांनी संन्यासी मार्गाकडे वळाले होते. त्यांच्या आध्यात्मिक प्रवासाने त्यांचे कौटुंबिक जीवन उद्ध्वस्त केले. विनोद खन्ना यांच्या कुटुंबीयांची इच्छा होती की त्यांनी त्यांच्याबरोबर राहावे. पत्नी गीतांजली यांनी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला होता पण विनोद खन्ना आपल्या निर्णयावर ठाम राहिले. यामुळे त्रस्त होऊन गीतांजली यांनी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आणि दोघे १९८५ मध्ये वेगळे झाले.
दुसऱ्या लग्नाची रंगली होती चर्चा
विनोद खन्ना यांच्या दुसऱ्या लग्नाची बरीच चर्चा रंगली होती. त्यांनी कविता दफ्तरी यांच्याशी १९९० मध्ये दुसरं लग्न केलं होतं. विनोद खन्ना आणि कविता यांना दोन मुले आहेत. २०१७ मध्ये कर्करोगामुळे विनोद खन्ना यांचे निधन झाले.