अभिनेत्री कश्मीरा शाहचा परदेशात अपघात झाला आहे. कश्मीराने इन्स्टाग्रामवर रक्ताने माखलेल्या टिश्यूंचा फोटो शेअर करत तिचा अपघात झाल्याची माहिती दिली. तिच्या अपघाताची बातमी येताच चाहते व तिच्या मित्र-मैत्रिणींना धक्का बसला. आता कश्मीराची नणंद व कृष्णा अभिषेकची बहीण आरती सिंहने वहिनीच्या अपघाताबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.

“देवा, मला वाचवल्याबद्दल आभार. भयंकर अपघात. काहीतरी मोठं होणार होतं, पण थोडक्यात बचावले. आशा आहे की या जखमांच्या खुणा राहणार नाहीत. रोजचा प्रत्येक क्षण जगा. आज माझ्या कुटुंबाची खूप आठवण येत आहे,” असं लिहून कश्मीराने एक फोटो पोस्ट केला. या फोटोत रक्ताने माखलेले टिश्यू कारच्या सीटवर दिसत आहेत.

हेही वाचा – कॉमेडियन कृष्णा अभिषेकची पत्नी, अभिनेत्री कश्मीरा शाहचा भीषण अपघात

कश्मीरा सध्या अमेरिकेत असून तिथेच तिचा अपघात झाला. आरती वहिनीच्या अपघाताबद्दल ई-टाइम्सशी बोलताना म्हणाली, “तिची पोस्ट पाहिल्यानंतर आम्ही सगळे काळजीत पडलो. मी कश्मीराशी बोललेय. ती आता बरी होत आहे. तिच्या नाकाला जखम झाली आहे. एका मॉलमध्ये ती काचेला धडकली, काच फुटली आणि तिच्या नाकाला लागलं. खूप रक्तस्त्राव झाला, पण आता ती सुखरूप आहे.”

हेही वाचा – “बॉलीवूड कलाकार दारूची…”, दिलजीत दोसांझची ‘त्या’ नोटीसनंतर टीका; सरकारला आव्हान देत म्हणाला…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कश्मीरा, तिचा पती कृष्णा अभिषेक व त्यांची दोन्ही मुलं हे सर्वजण लॉस एंजेलिसला सुट्टी घालवायला गेले होते. काही दिवसांपूर्वी कृष्णा व दोन्ही मुलं भारतात परतले, मात्र कश्मीरा तिकडेच थांबली होती. तिथेच तिचा अपघात झाला. कश्मीराची प्रकृती आता बरी आहे.