अभिनेत्री कंगना शर्मा मागील काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहे. ती चर्चेत असण्याचं कारण म्हणजे तिचे ग्लॅमरस व बोल्ड लूक्स आहेत. तिचे बोल्ड आउटफिटमधील व्हिडीओ चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहेत. अशातच कंगनाचा एक नवा व्हिडीओ समोर आला आहे, ज्यात तिचा तोल जातो आणि ती पायऱ्यांवर पडते.

कंगना शर्मा (Kangana Sharma Viral Video) मुंबईतील एका रेस्टॉरंटबाहेर पोज देत होती. तिने काळ्या रंगाचा शॉर्ट ड्रेस घातला होता व त्यावर हाय हील्स घातल्या होत्या. पोज देताना अचानक तिचा तोल गेला आणि जोरात खाली पडली. कंगनाचा पायऱ्यांवरून पडतानाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

कंगना शर्माचा व्हिडीओ –

व्हायरल व्हिडीओमध्ये कंगना पायऱ्यांवर उभी राहून पोज देत असते. नंतर एक पाऊल पुढे टाकताच, ती हाय हील्समुळे तिचा तोल जातो आणि ती खाली पडते. ती पडल्यावर तिला उचलण्यासाठी लोक तिथे येतात. त्यानंतर कंगना पाय धरून पायऱ्यांवर बसलेली व्हिडीओमध्ये पाहायला मिळते.

हेही वाचा – “ती मुलगी तिथे…”, चाहतीला किस करणाऱ्या उदित नारायण यांची कुमार सानूच्या एक्स गर्लफ्रेंडने घेतली बाजू; म्हणाली…

खरं तर कंगनाचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर तिच्या आउटफिटवर लोक खूप कमेंट्स करत आहेत. गेल्या काही दिवसांपासून ती अतिशय छोट्या कपड्यांमध्ये दिसत आहे. ज्यानंतर लोक त्याची उर्फी जावेदशी तुलना करत आहेत. एका यूजरने लिहिलं, ‘तुम्ही चालताही येत नाही तेव्हा एवढ्या उंच हील्स कशा घालता?’ तर एका युजरने जे झालं ते बरोबर आहे, अशी कमेंट केली. ‘कोणीही उर्फी जावेद होऊ शकत नाही,’ अशी कमेंटही या व्हिडीओवर आहे.

हेही वाचा – पाकिस्तानची ‘ऐश्वर्या राय’! २०० बिलियन डॉलर्सची कंपनी सोडली अन्…; भारतीय अभिनेत्रीशी तुलनेबाबत म्हणते…

व्हिडीओवरील कमेंट्स

Kangana Sharma trolled
कंगना शर्माच्या व्हिडीओवरील कमेंट्स (फोटो – इन्स्टाग्राम)

कंगना शर्मा तिच्या बोल्ड फॅशनमुळे नेहमीच चर्चेत असते. तिने ‘ग्रेट ग्रँड मस्ती’ मधून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले आणि नंतर ‘द कपिल शर्मा शो’ आणि ‘तू सूरज में सांझ पियाजी’ यांसारख्या शोमधून टीव्हीवर लोकप्रिय झाली.

हेही वाचा – भाजपा खासदार तेजस्वी सूर्या लग्नबंधनात अडकले, लोकप्रिय गायिका आहे पत्नी; पाहा विवाह सोहळ्यातील फोटो

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कंगनाने वैयक्तिक कारणांमुळे कामातून ब्रेक घेतला होता. पण आता ती परत सिनेविश्वात आली आहे. इन्स्टाग्रामवर तिचे २.८ मिलियन फॉलोअर्स आहेत. ती तिच्या अकाउंटवरून रोज फोटो व व्हिडीओ शेअर करत असते. नुकतीच ती ‘तेरे जिस्म २’ या म्युझिक अल्बममध्ये दिसली होती.