बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट सध्या तिच्या गरोदरपणामुळे चर्चेत आहे. ती लवकरच आई होणार आहे. गेल्या महिन्यात आलियाच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम मोठ्या थाटामाटात पार पडला. आलिया भट्टच्या बाळासाठी कपूर कुटुंबियाप्रमाणेच तिचे चाहतेही उत्सुक आहेत. आलियाच्या गरोदरपणाची चर्चा सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. मात्र नुकतंच अभिनेत्री कतरिना कैफने तिच्या होणाऱ्या बाळाबद्दल एक इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे ती चर्चेत आली आहे.

कतरिना कैफ ही सध्या तिच्या आगामी फोन भूत या चित्रपटामुळे चर्चेत आहे. येत्या ४ नोव्हेंबरला तिचा फोन भूत हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. सध्या कतरिना या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात कतरिनाही भूत रागिणी हे पात्र साकारत आहे. तर दुसरीकडे भूत पकडणारे ‘घोस्टबस्टर’ गुल्लू आणि मेजर यांची भूमिका सिद्धांत चतुर्वेदी आणि इशान खट्टर साकारत आहेत. या निमित्ताने दिलेल्या एका मुलाखतीत कतरिनाने आलियाच्या पोटावर हात ठेवण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
आणखी वाचा : “विकी कौशलविषयी बोललो की तू…” सलमान खानने कतरिना कैफसमोर केली उघडपणे कमेंट

या चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने कतरिना कैफ ‘बॉलिवूड बबल’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिला आलिया आणि दीपिकाबद्दल अनेक प्रश्न विचारण्यात आले. त्यावर तिने फारच स्पष्टपणे उत्तर दिले. जर तू भविष्यात कधीही आलिया भट्टला भेटलीस तर तू काय करशील, असा प्रश्न कतरिना कैफला विचारण्यात आला होता.

त्यावर उत्तर देताना ती म्हणाली, “आलिया ही सध्या गरोदर आहे. त्यामुळे मला तिच्या बेबी बंपला पाहून त्याला हात लावण्याची फार इच्छा आहे. हे करणे फारच गंमतीशीर आहे. पण मला हे करायचे आहे. मी अनेकदा तिला जीममध्ये पाहते. ती फारच मस्त आहे. अजूनही ती नियमित जीममध्ये येऊन वर्कआऊट करत असते. मला ती फार आवडते.”

आणखी वाचा : लग्नाआधीच गरोदर होती आलिया भट्ट? प्रसूतीच्या तारखेवरुन चर्चांना उधाण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान आलियाचा पती अभिनेता रणबीर कपूर आणि कतरिना कैफ यांचे अफेअर असल्याच्या चर्चा प्रचंड प्रमाणात व्हायरल झाल्या होत्या. मात्र काही काळानंतर त्यांचं ब्रेकअप झाला, असे बोललं जातं. आलिया भट्ट आणि रणबीर कपूरचे लग्न १४ एप्रिल २०२२ रोजी मुंबईत झाले होते. लग्नानंतर दोन महिन्यांनी म्हणजे जून महिन्याच्या अखेरीस त्यांनी ही गुडन्यूज चाहत्यांना दिली. त्यानंतर आता येत्या नोव्हेंबर अखेरीस ती तिच्या बाळाला जन्म देणार आहे.