अभिनेत्री कियारा अडवाणीने फार कमी वेळात बॉलीवूडमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. सध्या कियारा तिच्या ‘सत्यप्रेम की कथा’ चित्रपटाच्या यशाचा आनंद घेत आहे. नुकतच कियाराच्या एका फोटोवरुन ती गरोदर असल्याची चर्चा सगळीकडे रंगली होती. दरम्यान कियाराची एक जुनी मुलाखत सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तिने तिच्या गरोदरपणाबद्दल इच्छा व्यक्त केली होती.
हेही वाचा- ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ ने पहिल्या दिवशी किती कमाई केली? आकडेवारी आली समोर
कियाराची ही मुलाखत तिच्या ‘गुड न्यूज’ चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यानची आहे. ज्यामध्ये कियाराने गरोदर राहण्याची इच्छा व्यक्त केली होती. या मुलाखतीमध्ये कियारा म्हणालेली की, “मला गरोदर राहायचे आहे. जेणेकरून मी जे पाहिजे ते खाऊ शकेल. होणारं बाळ मुलगा आहे की मुलगी याने मला काही फरक पडत नाही. फक्त ते निरोगी असले पाहिजे.”
कियारा अडवाणीने यावर्षी ७ फेब्रुवारीला अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राबरोबर लग्नगाठ बांधली. हे लग्न राजस्थानमधील जैसलमेर येथे जवळचे मित्र आणि नातेवाईकांच्या उपस्थितीत शाही पद्धतीने पार पडले. ‘शेरशाह’च्या शूटिंगदरम्यान कियारा आणि सिद्धार्थ एकमेकांच्या जवळ आहे. त्यानंतर ते एकमेकांना प्रेमात पडले होते.
कियाराच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर नुकतीच ती कार्तिक आर्यनबरोबर ‘सत्यप्रेम की कथा’ या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटातील दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडली होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरही चांगली कमाई केली आहे. आता हा चित्रपट लवकरच OTT वर देखील प्रदर्शित होणार आहे.