सध्या महाराष्ट्राबरोबर संपूर्ण देशात होळीचा उत्साह पाहायला मिळत आहे. होळी साजरी केल्यानंतर लोकांनी धुळवडीमध्ये रंगाची उधळण केली. बॉलिवूडमध्ये होळी धूमधडाक्यात साजरी केली जाते. होळीनिमित्त बॉलिवूडमध्ये अनेक पार्ट्यांचं आयोजन केलं जातं. बॉलिवूड सेलिब्रिटींचे होळीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

‘इन्स्टंट बॉलिवूड’ या इन्स्टाग्राम पेजवरुन बॉलिवूडकरांच्या होळी सेलिब्रेशनचे फोटो व व्हिडीओ शेअर करण्यात आले आहेत. बॉलिवूड अभिनेत्री मंदिरा बेदीनेही होळी साजरी केली. मंदिरानेही बॉलिवूडकरांबरोबर रंगाची उधळण केली. होळीसाठी मंदिराने जीन्सची शॉर्ट व टॉप असा पेहराव केला होता. होळी खेळल्यानंतर पाण्याने चेहरा धुतानाचा मंदिराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवर कमेंट करत नेटकऱ्यांनी मंदिरा बेदीला ट्रोल केलं आहे.

हेही वाचा>> नवाजुद्दीन सिद्दीकीने पत्नी व मुलांना मध्यरात्री घराबाहेर काढलेल्या प्रकरणावर उर्फी जावेदचं भाष्य, म्हणाली “माझ्याबरोबरही…”

हेही वाचा>> ‘इंकलाब जिंदाबाद’, महात्मा गांधींचा फोटो अन्…; स्वरा भास्कर व फहाद अहमदच्या लग्नाची पत्रिका व्हायरल

“मला वाटतं सहा महिन्यांपूर्वीच हिच्या नवऱ्याचं निधन झालं. आणि ही बघा”, अशी कमेंट एकाने केली आहे. तर दुसऱ्याने “आज दीदी होळी खेळणार. हिच्या नवऱ्याचे सहा महिन्यांपूर्वीच निधन झालं आहे”,असं म्हटलं आहे. “नवरा गेला म्हणून काय झालं, अजून पण लोक आहेत”, असंही एकाने म्हटलं आहे. “पतीचं निधन होऊन थोडे दिवस नाही झाले आणि ही होळी खेळतेय”, अशी कमेंटही केली आहे. तर काहींनी आनंद साजरा करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे, असं म्हणत मंदिराची बाजू घेतली आहे.

हेही वाचा>> सोशल मीडिया स्टार असलेल्या महिला पोलिसाला छाप्यानंतर अटक; राहुल गांधींच्या ‘भारत जोडो’ यात्रेत झाली होती सहभागी, नेमकं प्रकरण काय?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मंदिरा बेदीने मनोरंजनविश्वात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. कौशल्याच्या जोरावर मंदिराने बॉलिवूड ते क्रिकेट विश्वापर्यंतचा यशस्वी प्रवास केला आहे. मंदिरा सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. मंदिरा बेदीचा पती दिग्दर्शक राज कौशलचं २०२१ मध्ये हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झालं. राज कौशलने ‘प्यार में कभी कभी’, ‘शादी का लड्डू’ सारखे चित्रपट दिग्दर्शित केले आहेत. मंदिरा बेदीने १९९९ मध्ये राज कौशलशी लग्न केलं होतं.