‘थ्री इडियट्स’ हा बॉलीवूड मधील एक लोकप्रिय चित्रपट म्हणून ओळखला जातो. २००९ साली हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. आजही हा चित्रपट लागला की सर्वजण आवडीने तो बघतात. या चित्रपटातील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. तर या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यानचा एक गमतीशीर किस्सा आता अभिनेत्री मोना सिंग हिने शेअर केला आहे.

आणखी वाचा : “आमिर खानने मला दिवसभर किस करायला लावलं…”, ‘हम हैं राही प्यार के’ फेम अभिनेत्रीने सांगितला शूटिंगदरम्यानचा किस्सा

अभिनेत्री मोना सिंग सध्या तिच्या ‘मेड इन हेवन’ या ॲमेझॉन प्राइमवरील सीरिजमुळे चर्चेत आहे. या सिरीजमधील तिच्या कामाचं खूप कौतुक होत आहे. आतापर्यंत ती अनेक चित्रपटांमध्ये झळकली. त्यापैकी तिने आमिर खानसोबत ‘३ इडियट्स’ आणि ‘लाल सिंग चड्ढा’ या दोन चित्रपटात काम केलं आहे. तर नुकताच तिने आमिर खानबरोबर काम करण्याचा तिचा अनुभव शेअर केला.

हेही वाचा : “आमिर खान मानसिकदृष्ट्या अस्थिर…,” प्रसिद्ध अभिनेत्याने केलं मिस्टर परफेक्शनिस्टला लक्ष्य, ट्वीट चर्चेत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘Galatta Plus’ ला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली, “जेव्हा मी थ्री इडियट्स शूटिंग करत होतो तेव्हा मी पहिल्यांदाच संपूर्ण टीमबरोबर काम करत होते. त्यावेळी आमिर खान यांच्याकडे बघून मला वाटलं की, अरे हे काय करत आहेत? आम्ही जवळपास १०० वेळा तालीम केली. त्यातील प्रत्येक वेळा ते नवीन काहीतरी करायचे. मी एक टेलिव्हिजन अभिनेत्री असल्याने या तालमींची मला सवय नव्हती. त्या तालमीन दरम्यान मला खूप कंटाळा यायचा. तेव्हा एकदा आमिर खान मला म्हणाले होते, मोना, हा चित्रपटाचा सेट आहे, मालिकेचा नाही. ही मालिका नाही जिथे उद्या एपिसोड प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट आहे तो पुढच्या वर्षी प्रदर्शित होईल. त्यामुळे आपल्याला कष्ट करावेच लागणार.” मोनाचं हे बोलणं आता खूप चर्चेत आलं आहे.