scorecardresearch

Pathaan Controversy : ‘पठाण’ विरोधात बजरंग दलाचं हिंसक आंदोलन पाहून पूजा भट्ट संतापली; ट्वीट करत म्हणाली..

व्हिडिओ शेअर करत पूजाने तिच्या ट्वीटमधून मोर्चा आणि दंगल यातील नेमका फरक मांडला आहे

Pathaan Controversy : ‘पठाण’ विरोधात बजरंग दलाचं हिंसक आंदोलन पाहून पूजा भट्ट संतापली; ट्वीट करत म्हणाली..
फोटो : लोकसत्ता ग्राफिक्स टीम

Pathaan controversy and Bajrang dal protes : शाहरुख खानच्या बहुप्रतिक्षीत ‘पठाण’ चित्रपटाच्या ट्रेलरची तारीख समोर आली आहे. १० जानेवारीला ‘पठाण’चा ट्रेलर प्रदर्शित होणार आहे. एकीकडे चाहते या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पहात आहेत तर दुसरीकडे या चित्रपटाला जबरदस्त विरोध होत आहे. वेगवेगळ्या स्तरातून ‘पठाण’ला बॉयकॉट करायची मागणी होताना दिसत आहे. चित्रपटातील गाणी आणि त्यातील अश्लीलता यामुळे ‘पठाण’ चांगलाच वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.

जसजसं चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख जवळ येत आहे तसतसं हा विरोध आणखी तीव्र होताना दिसत आहे. मनोरंजन विश्वातील मंडळीसुद्धा या चित्रपटाच्या समर्थनार्थ वक्तव्य करताना दिसत आहे. काही ठिकाणी या चित्रपटाचा होणार विरोध हा अत्यंत तीव्र झाला असून लोकांच्या मनात एक वेगळीच भीती निर्माण केली आहे. बॉलिवूड अभिनेत्री पूजा भटने नुकताचा एक असा व्हिडिओ शेअर कर या विरोधाची कठोर शब्दात निंदा केली आहे.

आणखी वाचा : हनी सिंगने केलं उर्फी जावेदचं कौतुक, म्हणाला “सगळ्या मुलींनी हिच्याकडून शिका…”

अहमदाबादमधील एका मॉलमध्ये बजरंग दलच्या काही कार्यकर्त्यांनी घुसून धिंगाणा घातल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी थिएटरमध्ये शिरून शाहरुख आणि दीपिकाची पोस्टर्स फाडून नष्ट केली आहेत आणि इतरही गोष्टींचं नुकसान केल्याचं आढळलं आहे. याबद्दलच पूजा भट्टने निषेध व्यक्त केला आहे.

हा व्हिडिओ शेअर करत पूजाने तिच्या ट्वीटमधून मोर्चा आणि दंगल या दोघांमधील नेमका फरक काय तो मांडला आहे. पूजा म्हणते, “निषेध/मोर्चा म्हणजे नापसंती दर्शवण्याचा एक संघटित सुनियोजित असा सार्वजनिक मार्ग. तर दंगल म्हणजे एका सामान्य उद्देशाने आणि हिंसक पद्धतीने केवळ दहशत निर्माण करण्यासाठी लोकांच्या जमावाने निर्माण केलेल्या शांततेचा भंग.” अशा मोजक्या शब्दात पूजाने या कृतीचा निषेध व्यक्त केला आहे. या चित्रपटातून शाहरुख खान तब्बल चार वर्षांनी मोठ्या पडद्यावर मुख्य भूमिकेत पुनरागमन करतोय. यापूर्वी तो रणबीर कपूरच्या ‘ब्रह्मास्त्र’मध्ये एका वैज्ञानिकाच्या भूमिकेत दिसला होता.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-01-2023 at 19:53 IST

संबंधित बातम्या