सिनेसृष्टीत बोल्ड फोटो आणि व्हिडीओमुळे प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री म्हणून पूनम पांडेकडे पाहिले जाते. ती तिच्या कामापेक्षा जास्त विविध वक्तव्यामुळे चर्चेत असते. अनेकदा यामुळे तिला ट्रोलिंगचाही सामना करावा लागतो. पण आता पूनम पांडेने एक मोठा निर्णय घेतला आहे. नुकतंच दिलेल्या एका मुलाखतीत तिने याबद्दल भाष्य केले आहे.

पूनम पांडे ही बॉलिवूडमधील अभिनेत्री आणि मॉडेल आहे. ती अनेकदा विविध विषयांवर तिचे मत स्पष्टपणे मांडताना दिसते. मात्र आता पूनमने या वादग्रस्त गोष्टींपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. नुकतंच नवभारत टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत पूनम पांडेने याबद्दल सांगितले. मी आता वादग्रस्त गोष्टींपासून दूर राहून कामावर लक्ष केंद्रीत करणार आहे, असे ती यावेळी म्हणाली.
आणखी वाचा : शिवाली परबच्या नव्या फोटोशूटवर चाहता फिदा, थेट लग्नाची मागणी घालत म्हणाला…

“मी यापुढे वादापासून दूर राहण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे आता मी फक्त माझ्या कामावर लक्ष केंद्रीत करणार आहे. मला असं वाटतंय की, एखाद्या वादग्रस्त गोष्टींमुळे तुम्हाला मिळणारी प्रसिद्धी ही फक्त १५ मिनिटांसाठी असते. त्यापेक्षा जास्त नाही. तो वाद सुरु असेपर्यंत लोक तुमची चर्चा करतात पण त्यानंतर ते तुम्हाला विसरले असतात.

पण त्या उलट तुम्हाला तुमच्या कामामुळे मिळालेली ओळख दीर्घकाळ टिकते. मी बर्‍याचदा काहीही बोलते. पण आता मला असे वाटतंय की कधी कधी गप्प बसणे देखील चांगले असते. खरं सांगायचं तर, मी आता गोष्टींचे मॅनेजमेंट करणं शिकली आहे. मला आता चांगल्या संधी मिळत आहेत. त्यासाठी देवाचे खरंच खूप खूप आभार”, असे पूनम पांडे म्हणाली.

आणखी वाचा : Union Budget 2023 : केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाल्यावर मराठी अभिनेत्याचे ट्वीट, म्हणाला “आज सगळेच…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान पूनम पांडे कंगना रणौतच्या वादग्रस्त शो ‘लॉकअप’मध्ये दिसली होती. या शोमध्ये करणवीर बोहरादेखील होता. शोमधून बाहेर पडल्यानंतरही या दोघांचे बाँडिंग वाढले आहे. पूनम मूळची कानपूरची असून गेली अनेकवर्ष बॉलिवूडमध्ये कार्यरत आहे. २०१३ साली आलेल्या नशा या चित्रपटातून तिने पदार्पण केले. ती तिच्या बोल्ड फोटोमुळे यापूर्वी अनेकदा वादात सापडली आहे.