बालकलाकार आणि सोशल मीडियावर एन्फ्लुएन्सर रीवा अरोरा तिने नुकत्याच पोस्ट केलेल्या फोटोंमुळे चर्चेत आली आहे. रीवाने अवघ्या १९ व्या वर्षी ‘डिजिटल एन्फ्लुएन्स व वूमन एम्पॉवरमेंट’ या विषयात पीएचडी केली आहे. तिने तिच्या पदवीबरोबरचे काही फोटो शेअर केले आहेत. ती आता डॉक्टर झाली आहे, अशी माहितीही तिने दिली. तिची ही पोस्ट पाहिल्यानंतर नेटकरी तिला ट्रोल करत आहेत.

‘भारत’ आणि ‘उरी: द सर्जिकल स्ट्राइक’ सारख्या चित्रपटांमध्ये काम करून रीवा अरोराला लोकप्रियता मिळाली. रीवाने इन्स्टाग्रामवर तिचे काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती दीक्षांत समारंभात परिधान केल्या जाणाऱ्या कपड्यांमध्ये दिसत आहे. रीवाच्या एका पायाला दुखापत झाली आहे, पण तरी ती पोज देत आनंद व्यक्त करताना दिसत आहे.

आदिशंकर वैदिक विद्यापीठातून रीवाने ही पीएचडी पदवी मिळवली आहे. तिने कॅप्शनमध्ये लिहिलं, आता मी डॉ. रीवा अरोरा आहे. हा टप्पा गाठणं म्हणजे एक स्वप्न पूर्ण होण्यासारखं आहे आणि मी जे काही मिळवलंय त्याचा मला खूप अभिमान वाटतोय. रीवाच्या या पोस्टर अभिनेता कुणाल सिंग, अभिनेत्री अनेरी वजानी, सचिन गुप्ता आणि इतरांनी कमेंट्स करून तिचं अभिनंदन केलं आहे. मात्र अनेक जण तिला ट्रोल करत आहेत.

हेही वाचा – एकमेकांना मिठी मारली अन्…, करीना कपूर-शाहिद कपूर जेव्हा १८ वर्षांनी भेटले; व्हिडीओ पाहून चाहते म्हणाले, “या दोघांना…”

रीवा अरोराची पोस्ट

१० वीत असताना कोणती डिग्री मिळते, १५ व्या वर्षी डॉक्टर, डिग्री पैसे देऊन घेतली असेल, आधी १० वीची परीक्षा तरी दे, यूजीसी ही डिग्री स्वीकारतं का? इतक्या कमी वयात कोण डॉक्टरेट पास करतं? आता कोणीही डॉक्टर होईल, कधी ट्युशनला गेली आहेस का? तुला ही डिग्री कशी मिळाली? अशा असंख्य कमेंट्स नेटकऱ्यांनी रीवाच्या या पोस्टवर केल्या आहेत.

हेही वाचा – फ्लॉप करिअर, २० वर्षांपूर्वी केलेलं आंतरधर्मीय लग्न अन्…; अभिनेत्री मुमताजचा जावई आहे ‘हा’ बॉलीवूड अभिनेता

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
riva arora trolled over degree post
रीवा अरोराच्या व्हिडीओवरील कमेंट्स (फोटो – इन्स्टाग्राम)

रीवा अरोराचं वय कमी असलं तरी ती सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहे. तिचे इन्स्टाग्रामवर ११.५ मिलियन फॉलोअर्स आहेत. रीवा अरोराने तिच्या करिअरमध्ये ४ चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये काम केले आहे. तिने सर्वात आधी ‘मर्द को दर्द नहीं होता’ या चित्रपटात काम केले, हा चित्रपट २०१८ मध्ये प्रदर्शित झाला होता. यानंतर तिने ‘उरी द सर्जिकल स्ट्राइक’, आणि ‘गुंजन सक्सेस द कारगिल गर्ल’मध्ये काम केले. या चारही चित्रपटांमध्ये रीवाच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले. रीवाने टीव्हीएफ ट्रिपलिंगमध्येही काम केले होते. या शोमधील एका गाण्यात ती दिसली होती. चित्रपटांव्यतिरिक्त रीवा अनेक म्युझिकल व्हिडिओंमध्येही दिसली आहे.