राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली निघालेली काँग्रेसची ‘भारत जोडो पदयात्रा’ सध्या महाराष्ट्रात आहे. देशभरातून कॉंग्रेस नेत्यांकडून या पदयात्रेला प्रतिसाद मिळत आहे. पश्चिम विदर्भात राहुल गांधी यांची पदयात्रा दाखल झाल्यानंतर पातूर येथे बॉलिवूड अभिनेत्रीनेही ‘भारत जोडो पदयात्रा’मध्ये सहभाग घेतला.

अभिनेत्री रिया सेन राहूल गांधींच्या भारत जोडो पदयात्रेत सहभागी झालेली दिसली. या पदयात्रेतील राहूल गांधींबरोबरचे तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यावेळी रियाने जीन्स व टॉप परिधान करत गॉगल लावून हटके लूक केलेला पाहायला मिळाला. पदयात्रेत सहभागी झालेल्या रिया सेनशी राहुल गांधी संवादही साधत असल्याचं फोटोत दिसत आहे.

हेही वाचा >> “तिला वाटायचं मी बाथरुममध्ये मुलांबरोबर…” जान्हवी कपूरने आई श्रीदेवी यांच्याबाबत केलेलं वक्तव्य चर्चेत

हेही वाचा >> शिव ठाकरे-वीणा जगतापचे ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील ‘ते’ फोटो व्हायरल, नेटकरी म्हणतात “गौतम-सौंदर्याची खिल्ली उडवणारा…”

कॉंग्रेसच्या भारत जोडो यात्रेला ७ सप्टेंबरपासून तामिळनाडू राज्यातील कन्याकुमारी येथून सुरुवात झाली. तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, तेलंगणा, आंध्रप्रदेश या राज्यांतून प्रवास करत गेल्या आठवड्यात महाराष्ट्रात ही पदयात्रा पोहोचली. रियाच्या आधी बॉलिवूड अभिनेत्री पूजा भट्टही भारत जोडो यात्रेत सहभागी झालेली दिसली.

हेही वाचा >> तमन्ना भाटिया व्यावसायिकाबरोबर थाटणार संसार? फोटो शेअर करत म्हणाली…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रिया सेन ही प्रसिद्ध अभिनेत्री मुनमुन सेन यांची मुलगी आहे. तिने बालकलाकार म्हणून अभिनय क्षेत्रातील करिअरला सुरुवात केली. फाल्गुनी फाटकच्या ‘याद पिया की आने लगी’ या गाण्यातही ती झळकली होती. ‘अपना सपना मनी मनी’ या चित्रपटाने रियाला लोकप्रियता मिळवून दिली. रियाने हिंदीबरोबरच मल्याळम, तेलुगु, तमिळ व बंगाली चित्रपटांतही काम केलं आहे.